डॉनल बिष्टने एक दीवाना था या मालिकेसाठी घातली आपल्या आईची बांगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 10:12 AM
एक दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा ...
एक दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक दीवाना था या मालिकेला सध्या अनेक वळणं मिळत असून या मालिकेतील रहस्यमय थ्रिलर प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. आता या मालिकेत एक विवाहसोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत शरण्या म्हणजेच डॉनल बिष्ट आणि तिचा प्रियकर व्योम म्हणजेच विक्रम सिंह चौहाण यांचे लग्न होणार आहे. शरण्याच्या वधूच्या लुकसाठी क्रिएटिव्ह टीम आणि डिझाइनर्स यांनी अनेक दिवस एकत्र काम केले आहे. त्यांनी तिला या खास भागासाठी उत्कृष्ट आभूषणे आणि खास लेहंगा बनवून दिला आहे. यातून तिला अद्ययावत लुक देण्याचा प्रयत्न मालिकेच्या टीमने केला आहे. तिचा लहंगा खास क्रिएटिव्ह टीम आणि डिझाइनर्सकडून तयार करण्यात आला आहे. त्यावर सोनेरी भरतकाम करण्यात आलेले आहे. त्याचे वजन जवळ जवळ ४० किलो इतके आहेप्रत्येक वधू पारंपरिक पोषाखात सुंदरच दिसते आणि त्या पोषाखास अनुरूप आभूषणे असल्यास तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तिचा लूक परिपूर्ण करण्यासाठी डॉनलच्या आईने तिला एक छानसी बांगडी दिली. ही बांगडी डॉनलच्या आईने तिच्या लग्नात घातली होती. या बांगडीविषयी डॉनल सांगते, “जेव्हा मी लग्नाच्या दृश्याबद्दल ऐकले, तेव्हा माझ्या मनात प्रथम हाच विचार आला की, माझी व्यक्तिरेखा वधूच्या रूपात उठावदार होण्यासाठी मी कशा प्रकारची आभूषणे घातली पाहिजेत. याचे उत्तर मिळवण्यासाठी मी माझ्या आईकडे गेले. कारण माझ्या आईने तिच्या लग्नात घातलेली एक सोन्याची बांगडी मला खूप आवडते. त्या बांगड्या खरंच खूप सुंदर आहेत. मला आनंद वाटतो की, माझ्या आईने मला मदत केली. माझे सह-कलाकार आणि सेटवरील सर्वांनाच ही बांगडी खूप आवडली. मला तर वाटते आहे की तो तिचा आशीर्वादच आहे. आई ही आपली सर्वात जवळची मैत्रीण असते आणि कोणत्याही परिस्थितीतून ती आपल्याला मार्ग दाखवते.”Also Read : एक दीवाना था या मालिकेची टीम पडली या सदस्याच्या प्रेमात