'...यांना कामधंदे नाहीत का?', अंथरुणाला खिळून असलेल्या वृत्तांवर संतापल्या वर्षा दांदळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:16 PM2022-10-19T12:16:52+5:302022-10-19T12:17:13+5:30
Varsha Dandale : काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कमबॅक केले.
अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांनी या मालिकेत वच्छी आत्याची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कमबॅक केले. परंतु मागील काही दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून असल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. दरम्यान आता अशा अफवा पसरवण्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वर्षा दांदळे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या नेहमीच विविध फोटो टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिन्यांपूर्वी वर्षा दांदळे यांच्या कारचा अपघात झाला होता. भंडारदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता. तेव्हापासून वर्षा या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. पण आता त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत आणि मालिकेत काम करत आहेत.
वर्षा दांदळे यांच्याबद्दल एका वेबसाइटवर अफवा पसरवणारी बातमी केली होती. वर्षा दांदळे या अंथरुणाला खिळून आहेत, असे त्यात म्हटले होते. तसेच त्यांची अवस्था पाहून धक्का बसेल असेही या वृत्तात म्हटलं होते. त्यावर वर्षा दांदळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या बातमीखाली कमेंट केली आहे. त्या म्हणाल्या की, मी छान ठणठणीत आहे. कोण आहेत ही माणसं. यांना कामधंदे नाहीत का काही?.
दरम्यान वर्षा दांदळे यांनी पाहिले नं मी तुला या मालिकेत काम केले आहे. त्याबरोबर त्यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका केली होती. याशिवाय वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी सवेरेंवाली गाडी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत.