Join us

Bigg Boss 17 मध्ये डबल एविक्शन? आएशा खाननंतर फिनालेपूर्वीच 'हा' सदस्यही होणार बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 9:08 AM

आज शेवटचा 'वीकेंड का वार' रंगणार

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) फिनाले काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरातील ८ सदस्यांपैकी 4 सदस्य आधीच फिनालेला पोहोचले आहेत. मुन्नावर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा यांना तिकीट फिनाले मिळाले आहे. तर अंकिता लोखंडे, विकी जैन, ईशा मालवीय आणि आयेशा खान नॉमिनेट झाले होते. दरम्यान कालच्या एपिसोडमध्ये आयेशा खान(Ayesha Khan) एलिमिनेट झाली आहे. शॉकिंग गोष्ट म्हणजे आज आणखी एक एलिमिनेशन होणार आहे. आज शेवटचा 'वीकेंड का वार' रंगणार असून यामध्ये ईशा मालवीय (Isha Malviya)घरातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा आहेत.

काल झालेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात काही चाहत्यांना बोलवण्यात आले. या चाहत्यांसमोर सदस्यांनी एकमेकांना रोस्ट केले. सदस्यांचा लाईव्ह स्टँडअप परफॉर्मन्स झाला. यानंतर चाहत्यांना तिथेच वोटिंग करत नॉमिनेट सदस्यांपैकी एकाला एलिमिनेट करायला सांगितले. या वोटिंगच्या आधारावर आयेशा खानला सर्वात कमी वोट मिळाले. त्यामुळे आएशा खानचा प्रवास काल संपला. आएशा बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन पोहोचली होती. तिच्या एलिमिनेशनची आधीपासूनच चर्चा होती. मात्र मेकर्सने डबल एव्हिक्शन करत सर्वांना धक्का दिला आहे. 'द खबरी' च्या माहितीनुसार या एविक्शनमध्ये ईशा मालवीय घरातून बाहेर पडणार आहे.

ईशा मालवीयचे एविक्शन शॉकिंग आहे कारण सोशल मीडियावर विकी जैनच्या नावाची जास्त चर्चा होती. आएशा नंतर विकी घरातून बाहेर पडेल असे बोलले जात होते. मात्र अचानक ईशा एविक्ट होणार असल्याचं द खबरीने म्हटले आहे. अर्थात आजच्या 'वीकेंड का वार' नक्की कोण बाहेर होणार हे अधिकृतरित्या स्पष्ट होईल. 

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेटिव्ही कलाकार