Join us

Video: 'तोंड बंंद कर तुझं!' जेवणावरुन आर्या अन् DP मध्ये खडाजंगी, दोघांमध्ये रंगला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:39 AM

जेवणाच्या मुद्द्यावरुन आर्या आणि धनंजयमध्ये उडाली वादाची ठिणगी (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आता तीन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात सुद्धा सदस्यांमध्ये चांगलाच वाद रंगलेला दिसतोय. निक्की - वैभव - अरबाज या टीमने घरातील इतर सदस्यांवर त्यांची दादागिरी दाखवली आहे. तर दुसरीकडे अंकिता वालावलकर-पॅडी कांबळे-धनंजय पोवार या तिघांचाही आक्रमक खेळ पाहायला मिळतोय. अशातच आज घरात धनंजय अर्थात DP आणि आर्यामध्ये वाद रंगलेला दिसतोय. 

जेवणावरुन धनंजय-आर्यामध्ये बाचाबाची

 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी आर्याला म्हणतोय,"मला असं वाटतं की तु कमी खावं". त्यावर आर्या म्हणते,"माझ्या जेवणावर कमेंट करायची नाही... मी एकदा जेवण करेल..दोनदा जेवण करेल..तुम्ही मला सांगू नका"". त्यावर धनंजय आर्याला म्हणतो,"तू तोंड बंद कर मग". तर आर्या तोंड बंद करण्यास नका देते. यावर धनंजय तिला म्हणतो,"मग मी तुला खाताना बोलणार". शेवटी DP तिला बोलतो की, "थर्ड क्लास लोकांबद्दल मी बोलत नाही." आर्याही वैतागून निघून जाते.

कोण होणार घरातला नवीन कॅप्टन

तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना आणखी कोणते नवे टास्क देणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. काल A टीम आणि B टीम मध्ये कॅप्टनसी टास्क रंगताना दिसतोय. आता या दोन टीमपैकी कॅप्टनसी टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण घराचा नवीन कॅप्टन होणार हे आज सर्वांना कळणार आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो पाहता येईल. तसेच Jio Cinema वरदेखील या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहता येतील. 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुख