Join us

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी केईएम रुग्णालयात बजावत आहेत कर्तव्य, करतायेत रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 1:23 PM

डॉ. अश्विनी अमोल कोल्हे या सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत आहेत.

ठळक मुद्देडॉ. अश्विनी अमोल कोल्हे या सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या २००९ पासून या रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनाच्या संकटात देखील त्या त्यांचे कर्जव्य बजावत आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. या सगळ्यात डॉ. अमोल कोल्हे कुठेही मागे नाहीत. ते मोठ्या प्रमाणावर गरजूंना मदत करत असून या संकटकाळात खूपच चांगले कार्य करत आहेत. 

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे देखील डॉक्टर आहेत. डॉ. अश्विनी अमोल कोल्हे या सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या २००९ पासून या रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनाच्या संकटात देखील त्या त्यांचे कर्जव्य बजावत आहेत. त्या दररोज केएम रुग्णालयात जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. 

केईएम रुग्णालयात अनेक कोरोनाबाधित असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची रुग्णालयाकडून खूप चांगली काळजी घेतली जात असून त्यातील अनेक रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. 

डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. शिरुर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हे