Join us

अमोल कोल्हे यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, स्वतः आहे डॉक्टर, सध्या कोरोना रुग्णांची करते सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:38 PM

डॉ. अश्विनी कोल्हे या केईएम रुग्णालयात २००९ पासून कार्यरत आहेत. त्या रोज सकाळी उठून घरातील कामं, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करून रोजच्या वेळेवर हॉस्पीटलमध्ये हजर असतात.

महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक रुग्णालयात कोरोनासारख्या भयंकर आजाराशी डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले इतर कर्मचारीही कसोशीनं झुंज देत आहेत. डॉक्टरांना तर दिवसाचे बारा-चौदा तास काम करावे लागतेय.   डॉ. अमोल कोल्हेची पत्नी डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यासुद्धा कोरोना विरोधात मैदानात उतरल्या आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या रुग्णांची सेवा करत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. डॉ. अश्विनी कोल्हे आणि डॉ. अमोल कोल्हे हे दाम्पत्य ही मदत करताना दिसत आहेत.

डॉ. अश्विनी कोल्हे या केईएम रुग्णालयात २००९ पासून कार्यरत आहेत. त्या रोज सकाळी उठून घरातील कामं, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करून रोजच्या वेळेवर हॉस्पीटलमध्ये हजर असतात.

हॉस्पीटलमधील इतर सहकाऱ्यांसोबत मिळून त्या रुग्णांची सेवा करत आहेत.कठीण आणि अवघड परिस्थितीत ते आज काम करत आहेत. त्यांनाही कुटुंब आणि घरदार आहे. परंतु, स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आज काम करत आहेत.

डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास अमोल कोल्हे यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज यश मिळवले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या इतकाच त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे.

अमोल यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या पत्नीचे आणि मुलांचे फोटो पाहायला मिळतात. त्यांच्या पत्नी खंबीरपणे कायम त्यांच्या पाठिशी उभ्या राहातात. काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संदेश इन्स्टाग्राम पोस्ट केला होता. या पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांच्या यशात त्या देखील भागीदार असल्याचे लगेचच लक्षात येते.