Join us

'पारू' मालिकेत नाट्यमय वळण, आदित्यच्या प्रपोजलला पारू देणार का होकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:27 IST

Paru Serial : आदित्य आणि पारूची प्रेमकहाणी उलगडत असताना प्रेक्षक प्रेम, मैत्री आणि सस्पेन्सच्या एका रोलरकोस्टर प्रवासावर जाणार आहेत.

'पारू' मालिकेतील (Paru Serial ) पारू आणि आदित्य या पात्रांनी सुरुवातीपासून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नशिबाच्या भावनिक वळणात, आदित्य आणि पारूची प्रेमकहाणी उलगडत असताना प्रेक्षक प्रेम, मैत्री आणि सस्पेन्सच्या एका रोलरकोस्टर प्रवासावर जाणार आहेत. 

पारूची प्रेम कथा लवकरच एक नाट्यमय वळण घेणार आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते. हे सर्व तेव्हा सुरू होते जेव्हा  प्रीतमला आदित्य  आणि पारूमधील प्रेमाबद्दल कळतं. प्रीतमला वाटतंय की आदित्यने पुढचे मोठं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. प्रीतमच्या प्रोत्साहनामुळे आदित्य त्याच्या आयुष्यातील प्रेमाला प्रपोज करण्याचा गंभीरपणे विचार करू लागला आहे. प्रीतमच्या मदतीने आदित्य पारूसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय प्रपोजल प्लॅन करतो. अखेर तो क्षण येतो. 

भावना आणि उत्साहाने भरलेल्या सुंदर सजवलेल्या वातावरणात, आदित्य त्याच्या मनातली गोष्ट पारुला सांगणार आहे. हा एक जादुई क्षण असणार आहे, जो  प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे. पण यात नियती एक वेगळा खेळ रचत आहे.  गुरुजी अचानक येतात आणि पारू समोर  एक धक्कादायक खुलासा करतात. ते तिला इशारा देतात की तिच्याच कुटुंबातील कोणीतरी तिला इजा करण्याचा कट रचत आहे. ही भविष्यवाणी नव्याने फुललेल्या प्रेमावर सावली टाकते. आदित्यचं  हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू त्याचे प्रोपोजल स्वीकारेल का? गुरुजींचा इशारा खरा ठरेल का? आदित्य आणि पारूचे प्रेम येणाऱ्या वादळातून वाचू शकेल का? यासाठी मालिकेचा आगामी भाग पाहावा लागेल.