दृष्टी धामी हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी दृष्टी धामी आई झाली. २२ ऑक्टोंबर रोजी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आता तिने पहिल्यांदाच चाहत्यांसोबत बाळाची एक झलक शेअर केली आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलीचा एक अतिशय गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दृष्टी धामीने लग्नाच्या 9 वर्षांनंतर एका मुलीला जन्म दिला. दृष्टीने आता सोशल मीडियावर पती नीरज खेमका आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दृष्टीने तिच्या लेकीला छातीशी कवटाळले दिसत आहे. यात तिच्या लेकीचा चेहरा दिसत नाही. "आता सर्व पार्ट्यांना थोडा उशीर होणार आहे! आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा" असं कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसोबत चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
दृष्टी धामीने 22 ऑक्टोबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला होता. तर 14 जून रोजी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. नीरज खेमका आणि दृष्टी यांचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. लग्नाच्या नऊ वर्षांनी हे दोघे आई-बाबा झालेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दृष्टी धामी व्हिव्हियन डेसेनसोबत 'मधुबाला' या टीव्ही सीरियलमुळे चर्चेत होती. ती शेवटची 'दुरंगा' या मालिकेत दिसली होती. याआधी ती 'मधुबाला', 'सिलसिला बदलते रिश्तों का', 'गीत हुई सबसे पराई', 'एक था राजा एक थी रानी', 'परदेश में है मेरा दिल' सारख्या शोमध्ये दिसली आहे.