आपण तिला सीतेच्या रूपात पाहिले असून त्या भूमिकेबद्दल तिच्यावर उदंड प्रेमही केले आहे. आता हीच सीता पुन्हा एकदा प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकण्यास सिध्द झाली आहे. आम्ही दुसऱ्या कोणाची नव्हे, तर मदिराक्षी मुंडले या अभिनेत्रीची गोष्ट करीत आहोत. ‘स्टार प्लस’वरील आगामी ‘कर्णसंगिनी’ या मालिकेमध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिया के राम आणि जात की जुगनी या दोन मालिकांनंतर मदिराक्षी टीव्ही मालिकाच नव्हे, तर प्रसिध्दीच्या झोतातूनही दूर झाली होती. पण या काळात ती कशाची तयारी करीत होती, त्याचे उत्तर आता सापडले आहे. आता ‘कर्णसंगिनी’ मालिकेत ती द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. ‘दिया और बाती हम’ आणि ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ यासारख्या दोन विलक्षण लोकप्रिय मालिकांची निर्मिती केलेले शशी आणि सुमीत मित्तल यांनीच ‘कर्णसंगिनी’चीही निर्मिती केली आहे. आता ‘सिया के राम’मध्ये मदिराक्षीने सीतेच्या भूमिकेत प्रेक्षकांवर जशी मोहिनी टाकली होती, तशीच ती द्रौपदीच्या भूमिकेतही घालेल, अशी आशा आहे.
सिया के राम या मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.तिने साकारलेली सिता प्रेक्षकांना खूपच आवडली. जाट की जुगनी या मालिकेत मदिराक्षी मुंडलेने हरयाणवी मुलीची भूमिका साकारली होती. यात ती बिट्टू म्हणजेच विशाल वशिष्टच्या प्रेयसी बनली होती.