'वीरा एक वीर की अरदास' या मालिकेतील वीराच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. तिने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला आहे. कारण तिला चित्रपटात काम करायचे आहे.
दिगांगनाने वीराच्या भूमिकेनंतर २०१५ साली 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली होती. वयाच्या सातव्या वर्षांपासून काम करणाऱ्या दिगांगनाने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला आहे. कारण तिला मॅच्युअर भूमिका करायच्या आहेत. ती म्हणाली की, 'मला चित्रपटात नशीब आजमवायचे आहे. टेलिव्हिजनची ओढ नाही असे नाही. वाटले तर मालिका साइन करेन. पण सध्या चित्रपटाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे मालिका अर्ध्यातून सोडता येणार नाही. जेव्हा तुम्ही टेलिव्हिजनवर जास्त दिसता त्यावेळी तुम्हाला सिनेमांच्या ऑफर्स येत नाही.'दिगांगनाच्या मते तिच्याकडे रुपेरी पडद्याचा अजिबात अनुभव नाही. त्यामुळे खूप मेहनत करावी लागली. दिगांगनाने सध्या तीन सिनेमे साइन केले असून त्यातील दोन गोविंदा सोबत आहेत. ती 'फ्राई डे' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात गोविंदा व वरूण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. त्यानंतर ती 'जलेबी' चित्रपटात दिसणार आहे.सलमान खानच्या रुपात मला मेंटॉर मिळाला असल्याचे ती सांगते. मात्र तिला अद्याप सलमानकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. तिला सलमानसोबत काम करायचे आहे. छोट्या पडद्यावरून रसिकांना दिगांगनाने भुरळ पाडल्यानंतर रुपेरी पडद्यावर ती कमाल दाखवेल का, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.२००२ साली छोट्या पडद्यावरील 'क्या हादसा क्या हकीकत' मालिकेत बालकलाकार म्हणून दिगांगनाने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. 'कुबूल है', 'बालिका वधू' या मालिकेत तिने काम केले. पण, तिला खरी ओळख 'वीरा एक वीर की अरदास' या मालिकेतील वीरामुळे मिळाली.