Join us

या कारणामुळे मेरे साई या मालिकेतील तोरल रासपुत्र झाली खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 9:48 AM

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या 'मेरे साईं' या मालिकेमध्ये शिर्डीच्या गावकऱ्यांनी नुकतेच साईंचे स्वागत केले. कारण ते द्वारकामाई येथून परतले. संपूर्ण ...

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या 'मेरे साईं' या मालिकेमध्ये शिर्डीच्या गावकऱ्यांनी नुकतेच साईंचे स्वागत केले. कारण ते द्वारकामाई येथून परतले. संपूर्ण गाव फुले आणि रांगोळ्यांनी सजवलं होतं. या मालिकेमध्ये तोरल रासपुत्र बायजाची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिला नुकतीच रांगोळी काढायची संधी मिळाली. ती खूपच चांगली रांगोळी काढते. त्यामुळे आपली ही कला इतरांना दाखवण्याची संधी मिळत असल्याने तोरल खूपच खूश होती. याविषयी तोरलशी संपर्क साधला असता ती सांगते, "बालपणापासून मी नेहमीच विविध प्रकारच्या रांगोळ्या काढते. आताही दरवर्षी दिवाळीत मी माझ्या वहिनीसोबत रांगोळ्या काढचे. अलीकडे आम्ही साई बाबांचे घरी परतण्याचे दृश्य मालिकेत दाखवले होते, ज्यात शिर्डीच्या संपूर्ण गावात फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. त्यामुळे मला माझे कौशल्य दाखवायची एक संधी मिळाली. मी अत्यंत सोप्या प्रकारची रांगोळी काढली. दररोजच्या शूटच्या धावपळीतून थोडी विश्रांती घेऊन स्वतःच्या छंदांमध्ये मला रमवता आले. त्यामुळे मी खूपच आनंदित झाले."मेरे साईच्या आगामी भागांमध्ये, शिर्डीत असलेले रत्नाकर गावकऱ्यांमध्ये विभाजन करू इच्छितात आणि एक स्पर्धा जाहीर करतात ज्यामध्ये सर्वाधिक पीक उत्पादन घेणारा शेतकरी मोठी रक्कम मिळवेल. एकमेकांच्या विरोधात असलेल्या गावकऱ्यांसाठी आता साई काय करतील? रत्नाकरला साई बाबा कोणता धडा शिकवतील? याची उत्तरे प्रेक्षकांना मेरे साई या मालिकेत मिळणार आहेत. दरम्यान तोरलच्या अभिनयाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. तिला आता या मालिकेच्या व्यक्तिरेखेच्या नावानेच लोक ओळखू लागले आहेत. तसेच मालिकेच्या सेटवर देखील तिला माँ म्हणून संबोधले जातेय. याबाबत तोरल रासपुत्र सांगते, “सेटवर सर्वजण मला माँ म्हणतात. बायजाची व्यक्तिरेखा साईला जपणारी एका ममताळू आईची आहे आणि साई नेहमी तिच्याकडे आईच्या नात्याने बघतात. माझ्या या भूमिकेमुळे सेटवरील लोकांना मला माँ म्हणून संबोधण्याची सवय लागली आहे. मातृ दिनाच्या दिवशी तर सेटवरील प्रत्येकाने मला आवर्जून मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. सेटवर इतके सारे लोक मला माँ म्हणत असल्याने मला जगत जननी असल्यासारखेच वाटायला लागले आहे. मेरे साई ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेतील सगळे कलाकार एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अबीर सुफी, वैभव मांगले आणि मेरे साईच्या सगळ्याच कलाकारांसोबत चित्रीकरण करणे हा खूपच चांगला अनुभव आहे.”Read : मेरे साईच्या सेटवर अबीर सुफीला मिळाला हा मित्र