Join us

Rubina Dilaik : "अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला मार लागलाय; मला मोठा धक्का बसलाय"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:41 PM

Rubina Dilaik : अपघातानंतर आता रुबिना दिलैकने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकच्या (Rubina Dilaik) कारचा अपघात झाला आहे. रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने (Abhinav Shukla) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. अपघातानंतर कारची झालेली अवस्था याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. तसेच अभिनवने ट्विटरवर माहिती देत रुबिनाच्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहे. सध्या ती पूर्णपणे ठीक असून अशा दुर्घटना कोणासोबतही होऊ शकतात त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहनही त्याने यामाध्यमातून केलं आहे.

अपघातानंतर आता रुबिना दिलैकने देखील प्रतिक्रिया दिली आहे. "अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे. घडलेल्या घटनेनंतर मला मोठा धक्का बसला आहे. मेडिकल टेस्ट केले असून सर्वकाही ठीक आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ट्रक ड्राइव्हरविरोधात कारवाई केली जात आहे. कारचंही नुकसान झालं आहे. रस्त्यावर सावधगिरी बाळगण्याचं आवाहन मी करते. नियम हे आपल्या सुरक्षिततेसाठीच असतात" असं रुबिनाने म्हटलं आहे. 

अभिनव शुक्लाने "आमच्यासोबत झालं, तुमच्यासोबतही होऊ शकतं. ट्रॅफिक लाईट जंप करणाऱ्या मुर्खांपासून सावध राहा. वरुन ते लोक हसत उभे राहिले. याविषयी अधिक माहिती नंतर देईन. रुबिना कारमध्ये होती आणि आता ती ठिक आहे. तिला प्राथमिक उपचारासाठी घेऊन जात आहे. मुंबई पोलिसांना विनंती अशा मुर्खांवर कडक कारवाई करा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अभिनवच्या या  ट्विटवर मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तिथल्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी' अशी सूचना त्यांनी केली आहे. यापूर्वी 'इश्क का रंग सफेद' फेम अभिनेत्री स्नेहल रायचाही कार अपघात झाला होता. तिची कार एका ट्रकला धडकली होती. तिने लिहिले होते, 'जे घडलं ते मला काही सेकंद समजलंच नाही. अचानक एका ट्रकने मला धडक दिली. माझ्या ड्रायव्हरने मला वाचवलं त्याचे आभार. आम्ही पोलिसांना सूचना केली, ते 10 मिनिटाने आले. त्यांचेही आभार.' 

टॅग्स :अपघातटेलिव्हिजनटिव्ही कलाकार