Join us

'रात्रीस खेळ चाले'मधील दत्ता उर्फ सुहास शिरसाटनं दुसऱ्यांदा पत्नीसोबत बांधली लग्नगाठ, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:55 PM

Suhas Shirsat : सुहास शिरसाटच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेमध्ये दत्ताच्या भूमिकेतून अभिनेता सुहास शिरसाट घराघरात पोहचला. सुहासची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव आहे स्नेहा माजगावकर. ती सध्या झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतून अश्विनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. तर सुहास शिरसाट याने चित्रपट, मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख जपली आहे. दरम्यान आता त्यांच्या लग्नाला १० वर्षे पुर्ण झाले. यानिमित्ताने त्या दोघांनी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सुहास मूळचा बीड जिल्ह्यातला तर स्नेहा ही साताऱ्याची आहे. सुहास आणि स्नेहा या दोघांची कॉमन फ्रेंड अनिता दाते हिच्यामुळे ओळख झाली होती आणि पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच स्नेहा आणि सुहास या दोघांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाले आहेत. हे सेलिब्रेशन करण्यासाठी मराठी इंडस्ट्रीतील त्यांच्या खास मित्र मैत्रिणींनी आउटडोअर टूरचे सरप्राईज प्लॅन आखले होते. यावेळी नंदिता पाटकर, पुष्कर सरद, आरती वबडगावकर या सेलिब्रिटींनी सुहास आणि स्नेहाचे  पुन्हा एकदा लग्न लावून दिले. प्रेक्षकांना या सोहळ्यातला हा साधेपणा मात्र खूप भावला. कारण या साधेपणातच स्नेहा आणि सुहासचे सुख चेहऱ्यावर तरळलेले पाहायला मिळाले. या सोहळ्यातला दुहेरी आनंद म्हणजे ९ जूनला स्नेहा आणि सुहासच्या लग्नाचे सेलिब्रेशन तर झालेच. पण १० जूनला सुहासचा वाढदिवस असल्याने त्याचेही सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडले. या दोन दिवसात त्यांनी जी धमाल मजामस्ती अनुभवली त्याचे काही खास क्षण स्नेहा आणि सुहासने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानिमित्ताने १० वर्षांनी दोघांवर पुन्हा एकदा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गोड सरप्राईज मिळालं...

स्नेहाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लग्नाच्या १० वर्षानंतर पुन्हा त्याच दिवशी आम्हाला गोड माणसांकडून एक गोड सरप्राइज मिळाले त्यांनी आमचे पुन्हा लग्न लावून दिलं…. हे दोन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ९ जून आणि १० जून ९ ला लग्नाचा आणि १०ला सुहासचा वाढदिवस या माणसांमुळे आणखीन आनंदाचे गेले.