Join us

आठ वर्षांपूर्वी सलमान खानमुळे वाचले होते कवी कुमार आझाद यांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 3:37 PM

आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते.

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी 9 जुलैला मीरा रोड मधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे त्यांचे वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे वजन 140 किलो झाले होते. कवी कुमार आझाद यांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यावेळी त्यांची अवस्था इतकी वाईट होती की, ते जिवंत राहातील का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यांच्यावर लगेचच उपचार करणे आणि विशेषतः शस्त्रक्रिया करून त्यांचे वजन कमी करणे हे त्यावेळी खूपच गरजेचे होते. पण वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखोने पैसे लागतात. त्यावेळी कवी कुमार आझाद यांच्याकडे तितके पैसे नव्हते. कवी कुमार आझाद यांच्या या परिस्थितीविषयी बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला कळल्यानंतर तो त्यांच्या मदतीसाठी धावून आला होता. त्याने त्यावेळी सांगितले होते की, केवळ पैशांसाठी कवी कुमार आझाद यांच्यावरील कोणतेही उपचार थांबता कामा नये. सलमान कवी कुमार आझाद यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. मुफ्फी यांच्यासोबत सतत संपर्कात होता. कवी कुमार आझाद यांच्या उपचारासाठी लागलेले सगळे पैसे त्यावेळी सलमानने दिले होते. 

कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले होते. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथची भूमिका साकारत होते. पण त्यांनी ही मालिका सोडल्यामुळे २००८ मध्ये कवी कुमार आझाद यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माकवी कुमार आझादसलमान खान