Join us

"आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा नव्हता", पवित्रा पुनियाच्या वक्तव्यानंतर एजाज खानची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:23 IST

सुरुवातीला मतभेदांमुळे वेगळं झाल्याचं सांगितल्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एजाजने तिच्यावर धर्मांतराचा दबाव आणल्याचा खुलासा केला. यावर आता एजाजने प्रतिक्रिया दिली आहे. 

पवित्रा पुनिया आणि एजाज खान हे कलाविश्वातील लोकप्रिय कपल होते. 'बिग बॉस १४'मध्ये या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. काही वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांचं ब्रेकअप झालं. एजाज खान आणि पवित्रा पुनियाच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना धक्का बसला होता. सुरुवातीला मतभेदांमुळे वेगळं झाल्याचं सांगितल्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एजाजने तिच्यावर धर्मांतराचा दबाव आणल्याचा खुलासा केला. यावर आता एजाजने प्रतिक्रिया दिली आहे. 

टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा पुनियाने केलेल्या वक्तव्याने एजाजच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून ते नाराज असल्याची माहिती त्याच्या टीमकडून देण्यात आली आहे. एजाजतर्फे त्याच्या स्पोक्सपर्सनकडून बाजू मांडण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये कधीच धर्माचा मुद्दा आला नसल्याचं स्पष्टीकरण अभिनेत्याकडून देण्यात आलं आहे. पवित्राच्या वक्तव्यानंतर एजाजच्या वडिलांना त्यांच्या मित्रांचे फोन येत असून तुझ्या मुलाने गर्लफ्रेंडला खरंच मुस्लीम धर्म स्वीकारायला लावला का? अशी विचारणा होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

"या संपूर्ण प्रकरणामुळे ते दुखावले गेले आहेत. कारण, जेव्हा एजाज आणि पवित्राच्या नात्याबद्दल त्यांना कळलं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला होता. त्यांच्या नात्यात धर्माचा मुद्दा कधीच आला नव्हता. आणि आता सगळं संपल्यानंतर हे सगळं बोललं जात आहे", असं एजाजकडून म्हटलं गेलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉससेलिब्रिटी