बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीत काम करत असताना अनेकजण आपले खाजगी आयुष्य त्यांच्या फॅन्सपासून लपवणे पसंत करतात. त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ते विवाहित आहेत का, नसल्यास त्यांच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आहे का यांसारखे अनेक प्रश्न कलाकारांच्या चाहत्यांना पडलेले असतात. पण काही कलाकार केवळ आपल्या चित्रपट आणि मालिकांपुरताच गप्पा मारतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपल्या खाजगी आयुष्याविषयी आपल्या चाहत्यांना काही कळणार नाही याची काळजी घेतात.
अभिनेता राम यशवर्धन सध्या स्टार भारतवरील ‘एक थी रानी एक था रावण’ मध्ये स्टॉकरची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला आणि या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच्या लूक्समुळे तर त्याच्या महिला चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण त्याने नुकतेच आपल्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधांबद्दल बोलून अनेकांची मने मोडली आहेत. जेव्हा राम ‘एक थी रानी एक था रावण’ या शोमध्ये तो दाखल होत होता... तेव्हा तो आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी मौन राखणेच पसंत केले होते.
रामने त्याच्या लग्नासंबंधित गुपित अनेक वर्षांपासून राखले होते. पण आता त्याने सगळ्यांना सांगितले आहे की, त्याचे लग्न झाले आहे. रामने आजतागायत आपल्या लग्नासंबंधी कबुली दिली नव्हती. अर्थातच त्यामागे त्याची काही कारणे असतील. मात्र हल्लीच त्याने सोशल मीडियावर आपल्या पत्नीसोबत एक फोटो पोस्ट केला असून आपल्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. याविषयी राम सांगतो, “होय, माझे लग्न झाले आहे आणि आता हे काही गुपित नाहीये. मी माझ्या पत्नीसोबत खूप खुश आहे. मी या इंडस्ट्रीत नवीन होतो आणि त्यामुळे माझ्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्यासाठी तयार नव्हतो. त्यामुळेच मी याबद्दल माझ्या चाहत्यांना सांगितलेले नव्हते. ”
‘एक थी रानी एक था रावण’ ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार भारतवर पाहायला मिळते.