Join us

टीव्ही इंडस्ट्रीतील या घट्ट मैत्रिणींमध्ये वितुष्ट, इन्स्टाग्रामवर एकमेकींना केले अनफॉलो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:51 AM

होय, टीव्हीवरच्या या घट्ट मैत्रिणींमध्ये तूर्तास सगळे काही ठीक नसल्याचे कळतेय.

ठळक मुद्देमोना सिंगने एकताच्या क्या हुआ तेरा वादा, इतना करो न मुझे प्यार, कवच आणि कहने को हमसफर अशा अनेक मालिकेत काम केले आहे.

एकता कपूरचे नाव सध्या चर्चेत आहे. सर्वप्रथम दिव्यांका त्रिपाठीसोबत एकताचे संबंध बिघडल्याची चर्चा झाली. ही चर्चा फेटाळून लावल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीसोबत एकताचा वाद झाल्याचे कळतेय. ही अभिनेत्री कोण तर मोना सिंग.होय, निर्माता एकता कपूर व तिची बेस्ट फ्रेन्ड मोना सिंग यांच्यात तूर्तास सगळे काही ठीक नसल्याचे कळतेय. मोनाने एकताच्या अनेक शोमध्ये काम केले. दोघेही अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसतात. केवळ इतकेच नाही तर एकताच्या घरच्या सर्व कार्यक्रमांना मोना हजर असते. पण स्पॉटबायने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून मोना व एकता कपूर यांच्यात बिनसले आहे.

गत शुक्रवारी एकताच्या MOM (मिशन ओवर मार्स) आणि कोल्ड लस्सी और चिकन मसाला  या दोन वेबसीरिजच्या लॉन्चिंग इव्हेंटला साक्षी तंवर, दिव्यांका त्रिपाठी, राजीव खंडेलवाल असे सगळे एकताचे मित्र हजर होते. पण मोना सिंग यावेळी हजर नव्हती. विशेष म्हणजे, MOM या वेबसीरिजमध्ये मोना महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. असे असताना ती या इव्हेंटला उपस्थित नव्हती.

मोना सिंगची प्रकृती बरी नसल्याने ती या इव्हेंटमध्ये येऊ शकली नाही, असे यावेळी मीडियाला सांगितले गेले. पण सूत्रांचे मानाल तर, मोना जाणीवपूर्वक या इव्हेंटला अनुपस्थित राहिली. काही दिवसांपूर्वी एकता व मोनामध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. यामुळे दोघींनीही एकमेकींशी बोलणे बंद केले. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघींनीही इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केले आहे.

हा वाद लवकरच निवळेल, अशी आशा आहे. मोना सिंगने एकताच्या क्या हुआ तेरा वादा, इतना करो न मुझे प्यार, कवच आणि कहने को हमसफर अशा अनेक मालिकेत काम केले आहे.

टॅग्स :एकता कपूरमोना सिंग