Join us

एकता कपूर आणि मोना सिंगच्या मैत्रीत आला दुरावा, इन्स्टावर केले अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 18:00 IST

एकता कपूर आजकाल वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. दिव्यांका त्रिपाठीसोबत झालेल्या वादामुळे एकता चर्चेत आली होती.

एकता कपूर आजकाल वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. दिव्यांका त्रिपाठीसोबत झालेल्या वादामुळे एकता चर्चेत आली होती. मात्र दिव्यांकासोबत कोणाताच वाद नाही नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आजतकच्या रिपोर्टनुसार दिव्यांकापाठोपाठ आणखी एक टिव्ही अभिनेत्रीसोबत एकताच वाद झाला आहे. एकता आणि तिची बेस्टफ्रेंड मोना सिंग यांच्यात सगळं काही ठिक नाहीय. मोनाने एकताच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. दोघी अनेक पार्टीमध्ये सुद्धा एकत्र दिसतात ऐवढेच काय तर मोना सिंग अनेक वेळा एकता घरीदेखील यायची. रिपोर्टनुसार दोघींनी एकमेंकीशी बोलणं बंद केले आहे.   

गेल्या शुक्रवारी एकताने आपल्या दोन वेबसीरिज लाँच केल्या. यावेळी दोनही वेबसीरिजची संपूर्ण टीम याठिकाणी हजर होते. साक्षी तन्वर. दिव्यांका त्रिपाठी आणि राजीव खंडेलवाल याठिकाणी उपस्थित होते मात्र यात इव्हेंटच्या ठिकाणी मोना सिंग पोहोचलीच नाही.  MOM वेबसिरीजमध्ये साक्षी तन्वर, निधी सिंग सोबतच मोना सिंगची मुख्य भूमिका आहे.  

मोना सिंगची तब्येत ठिक नसल्यामुळे ती या कार्यक्रमाला येऊ शकली नसल्याचे मीडियाला सांगण्यात आले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार दोघांमध्ये काही कारणाला घेऊन वाद झाला आहे. त्यामुळे दोघींनी एकमेकींशी बोलणं बंद केले आहे. गोष्टी इतक्या वाढल्या आहेत की दोघींनी एकमेंकीना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. आशा आहे दोघींमधला वाद लवकरच संपले.   

टॅग्स :एकता कपूरमोना सिंगइन्स्टाग्राम