कोरोनाच्या प्रार्दुभावाने गेले तीन महिने सर्व काही ठप्प होतं पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगीसुद्धा निर्मात्यांना मिळाली आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या मालिका पाहायला मिळत नव्हत्या. पण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
लॉकडाऊननंतर महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगला सशर्त परवानगी दिली आहे.सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पाळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू करण्याचा एकता कपूरने निर्णय घेतला आहे. 20 जूनपासून शूटिंग सुरुवात होणार आहेय शूटिंगला सुरूवात होण्यापूर्वीच संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे. मालिकेत एरिका फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. खरं तर कोरोनाच्या वातावरणात शूटिंगसाठी ती तयार नव्हती. पण सेटवर सर्व खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन टीमने तिला दिले आहे.
मालिकेतील दुसरे महत्त्वाचे पात्र साकारणारा पार्थ काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्राला हैदराबादला भेटायला गेला होता. टीमने त्याला मुंबईत येण्यास सांगितले आहे. मुंबई गाठल्यानंतर पार्थला काही दिवस क्वारंटाईन राहावे लागेल, त्यानंतरच तो शूट सुरू करू शकेल.
एकता कपूर व्यतिरिक्त निर्माता राजन शाही यांनी आपल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या टीमला शूटिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत ते शूटिंगलाही सुरुवात करतील.