टेलिव्हिजची क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) सध्या चर्चेत आहे ती ‘नागीन 6’ या मालिकेमुळे. या मालिकेसाठी एकताला अभिनेत्रीचा शोध आहे. अद्याप तरी एकताला तिच्या या मालिकेसाठी हिरोईन मिळालेली नाही. पण अशात एकताबद्दल एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. होय, एकताच्या एका पोस्टनंतर तिच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.
‘मी सध्या डेट करत नाहीये. तुम्हाला माझ्यात रुची असेल, तर तुम्ही मला माझा वेळ कसा वाया नाही घालवणार, यावर पाचशे शब्दांचा निबंध लिहून देऊ शकता,’अशी पोस्ट एकताने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केली आहे. यावरून एकताचा ब्रेकअप झाला की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
एकताने याशिवाय आणखी एक इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. ‘मला हाय मेंटेनन्समध्ये राहणं पसंत आहे. कारण मलाच तर सगळं मेंटेन करायचं आहे,’असं तिने या दुसºया पोस्टमध्ये लिहिलं आहे. या दोन्ही पोस्टवरून एकताच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज बांधला जात आहे.मध्यंतरी एकता कपूरने तनवीर बुकवाला याच्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. ‘... आणि आम्ही इथे आहोत. लवकरच तुम्हाला सांगू,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. तिच्या या पोस्टनंतर एकता व तनवीर यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. तनवीर हा लेखक आहे शिवाय डिंग एंटरटेनमेंटचा संस्थापक आहे.
7 जून 1979 रोजी अभिनेते जितेन्द्र आणि शोभा कपूर यांच्या पोटी जन्मलेली एकता एकदिवस बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाईल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. पण आज एकता केवळ टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन नाही तर टेलिव्हीजनपासून सिनेसृष्टीत काम करणाºया अनेक कलाकारांची गॉड मदरही आहे.
विद्या बालन, सुशांत सिंग राजपूत या कलाकारांना एकताने ब्रेक दिला होता. वयाच्या 19 व्या वर्षी एकताने करिअरची सुरुवात केली. आई शोभा कपूरसोबत मिळून तिने बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली. इतक्या वर्षांत दोघी मिळून बालाजीचे साम्राज्य सांभाळत आहेत. एकताने टीव्हीवर सास-बहू ड्रामा आणला. शिवाय त्यात बोल्ड कंटेंट आणून एक धाडसी पाऊल उचलले.