Join us

Video : प्राची देसाई व राम कपूर यांच्यातील किसिंग सीन असा झाला होता चित्रीत, एकता कपूरनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 19:00 IST

प्राची देसाई व राम कपूर यांचा 'कसम से'मधील किसिंग सीनच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा एकता कपूरने सांगितला आहे.

टेलिव्हिजन जगतातील क्वीन एकता कपूर हिने कित्येक लोकप्रिय मालिका बनवल्या आहेत आणि आता ती चित्रपटांची निर्मिती करतेय. नुकतेच एकता कपूरने २००६ साली तिची प्रसारीत झालेली मालिका 'कसम से'चा एक इंटरेस्टिंग बाब शेअर केली. या मालिकेतील काही सीन प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते. या मालिकेतील एक सीन एकता कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

एकता कपूर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात कसम से मालिकेतील मुख्य जोडी प्राची देसाईराम कपूर रोमांस करताना दिसत आहेत. या मालिकेत बानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची देसाई फक्त १७ वर्षांची होती. तर राम कपूर मिस्टर वालियाची भूमिका करत होता. त्यावेळी प्राचीने रामसोबत किसिंग सीन करण्यासाठी नकार दिला होता. 

आपल्या पोस्टमध्ये एकताने सांगितलं की, किसिंग सीन शूट करताना त्यांना शॅडो व लाईटचा वापर करावा लागला होता. या सीनबद्दल खूप चर्चा झाली होती. तिच्या पोस्टच्या शेवटी एकताने प्रेक्षकांना विचारले की कसम से मालिकेतील बानी व मिस्टर वालिया यांच्यातील रोमांस किती जण पाहू शकले नाहीत.

एकताने लिहिले की, या तीन मिनिटांचा सीक्वन्स शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले होते. बानीने मिस्टर वालियाला किस करण्यास नकार दिला होता. सतरा वर्षांच्या अभिनेत्रीला कोणतीही लाज वाटण्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही शॅडो व लाइट्सचा वापर केला होता. त्यामुळे हा  सीन बालाजीमधील सर्वात चर्चित आणि टॉप रेटेड बनला होता. ज्यांनी कसम से, मिस्टर वालिया व बानी यांचा रोमांस मिस केला. राम या मालिकेत खूप चांगला वाटला. 

एकताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिचे चाहत्यांमध्ये या मालिकेचा रिमेक बनणार असल्याची चर्चा रंगताना दिसते आहे. मागील वर्षी एकताने कसौटी जिंदगी केचा दुसरा भागाच्या वेळी सांगतानादेखील असाच इशारा केला होता आणि त्याचा रिमेक प्रसारीत केला. हा रिमेकही रसिकांच्या पसंतीस चांगलाच उतरला आहे.

त्यामुळे आता एकता कसम से २ प्रेक्षकांच्या भेटीला आणते का, हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.

टॅग्स :एकता कपूरप्राची देसाईराम कपूर