Join us

"अनप्रोफेशनल कलाकार...", एकता कपूर भडकली; पोस्ट शेअर करत राम कपूरवर साधला निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:48 IST

एकता कपूरने काही तासापूर्वी स्टोरी शेअर करत लिहिले,

निर्माती एकता कपूरची (Ekta Kapoor) 'टीव्ही क्वीन' अशी ओळख आहे. एकताने अनेक कलाकारांना संधी मालिकांमध्ये संधी दिली आहे. तिच्या मालिकांमधून कित्येक जण टीव्ही विश्वातील स्टार झालेत. मात्र आता नुकतीच ती एका एका कलाकारावर भडकली आहे. नाव न घेत तिने त्याला अनप्रोफेशनल म्हटलं आहे.  क्रिप्टिक पोस्ट शेअर करत तिने आपला राग व्यक्त केला आहे. तिने पोस्टमध्ये काय लिहिलं आणि नक्की हे प्रकरण काय वाचा.

एकता कपूरने काही तासापूर्वी स्टोरी शेअर करत लिहिले, "अनप्रोफेशनल कलाकारांनी माझ्या शोसंदर्भात मुलाखती देणं बंद करावं. चुकीची आणि तथ्य नसलेली माहिती मी बोलत नाही तोवरच चालेल. पण शांत राहण्यात सुद्धा एक प्रतिष्ठा आहे." तसंच पुढे तिने आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यात लिहिले आहे, 'जेव्हा तुम्ही स्वत:वर काम करत असता तेव्हाच असं काहीतरी होतं की तुम्हाला त्या मूडमधून बाहेर यावं लागतं.'

एकता कपूरचा निशाणा नक्की कोणावर आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? तर नुकतंच 'बडे अच्छे लगते है' अभिनेता राम कपूरने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यामध्ये त्याने मालिकेतील इंटिमेट सीनवरुन भाष्य केलं होतं. एकता कपूरला तो सीन हवाच होता आणि त्यामुळे नंतर जे घडलं ते एकतानेच हँडल केलं असं तो म्हणाला होता. आता एकता कपूरची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचा निशाणा राम कपूरवरच असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

'बडे अच्छे लगते है' मधील त्या सीनआधी साक्षीच्या वडिलांनी राम कपूरला केला होता कॉल, म्हणाला...

राम कपूर मुलाखतीत नेमकं काय म्हणाला?

मालिकेतील इंटिमेट सीनवर राम कपूर म्हणाला,  "एकताने तो सीन लिहिला. त्यावर मी तिला विचारलं की नक्की हे करायचंय ना. कारण आम्ही टीव्हीवरील पहिलेच असे कलाकार होतो जे असा सीन देणार होतो. ही मालिका लहान मुलं, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा सगळ्याच वयोगटातले प्रेक्षक बघत होते. करायचंच आहे अशी एकताला खात्री होती म्हणून मी आधी पत्नीची परवानगी घेतली. तिने होकार दिला नंतर मी साक्षीला विचारलं की तू नक्की तयार आहेस ना? नसशील तर एकताला मी समजावेल. पण तिलाही काहीच अडचण नव्हती. साक्षीच्या वडिलांनी मला फोन केला. ते म्हणाले, 'राम तू आहेस म्हणून मला विश्वास आहे'. मला ते ऐकून चांगलं वाटलं. साक्षीनेही माझ्यावर विश्वास दाखवला होता. दोन रात्रीत आम्ही तो सीन शूट केला. यानंतर जे झालं ते सगळं एकतानेच हँडल केलं."

टॅग्स :एकता कपूरराम कपूरटेलिव्हिजनसोशल मीडिया