Join us

एकता कपूरने केले का लग्न? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:43 IST

एकताने शेअर केलेल्या व्हिडिओत तिच्या कपाळावर आपल्याला सिंदूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून एकताने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

ठळक मुद्देहा व्हिडिओ पाहून एकताने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एकताचे चाहते सोशल मीडियाद्वारे एकताला याविषयी विचारत आहेत.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी मंगळवारी नऊ फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. अनिताच्या मुलाची पहिली झलक समोर आली आहे. ज्यात अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी आपल्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याला घेऊन खूप उत्साहित आहेत. सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण त्याचसोबत आणखी एका गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती म्हणजे एकता कपूरची...

अनिताला मुलगा झाल्यानंतर तिची लाडकी मैत्रीण एकता कपूर तिला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती. एकताने तिथे अनितासोबत एक व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर शेअर केला होता. या व्हिडिओत एकताच्या कपाळावर आपल्याला सिंदूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून एकताने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. एकताचे चाहते सोशल मीडियाद्वारे एकताला याविषयी विचारत आहेत. एकता आणि अनिता या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. एकताच्या अनेक मालिकांमध्ये अनिताने काम केले आहे. तसेच एकताची निर्मिती असलेल्या कुछ तो है या चित्रपटात देखील अनिताने काम केले होते. 

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. २०१३ मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे.

टॅग्स :एकता कपूर