Join us

'जिजाजी छत पर है' मालिकेतील इलायचीच्या अडचणीत होते आणखीन वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 20:45 IST

सोनी सबची 'जिजाजी छत पर है' ही मालिका त्यातल्या विचित्र पात्रांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

सोनी सबची 'जिजाजी छत पर है' ही मालिका त्यातल्या विचित्र पात्रांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चांदणी चौकातील प्रत्येकजण आता सुटकेचा निश्वास सोडतो आहे, कारण चुडैल निघून गेली आहे. पण आता नवीनच समस्या समोर आली आहे.

अशी अफवा पसरली आहे की, कुठल्याही स्त्रीसोबत बोलणाऱ्या चांदणी चौकातल्या पुरुषांच्या तोंडाला केक फासला जातोय. दरम्यान, पिंकी दरोगा आपल्या पोलीस अधीक्षक असलेल्या मुलाचे स्थळ इलायचीसाठी घेऊन येते. मुलाने आपल्याला नकार द्यावा आणि त्याला आपल्या संस्कार, शिष्टाचार ह्याबद्दल शंका यावी म्हणून इलायची त्या मुलाला पिण्याचे नाटक करून छळते. येथे तिच्या समस्येत आणखी वाढ होते, कारण या सर्व प्रकाराने न रागावता तो मुलगा उलट तिच्‍याकडे प्रभावित होतो आणि तिच्याशी लग्न करण्यास होकार देतो. म्हणून इलायची आणि पंचम (निखिल खुराना) ह्यांना आता मुरारी कसा ह्या लग्नाला नकार देईल ह्याची काळजी लागलेली आहे. मुरारी त्यांचे ऐकेल का? ह्या लग्नाच्या भानगडीतून इलायचीची सुटका कशी होईल ?इलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्हणाते, बाबांना या लग्नाला नकार देण्यासाठी तयार करणे हे इलायचीसाठी कठीण होऊन बसले आहे. मात्र चांदणी चौकात पुरुषांच्या तोंडावर केक फसल्या जाण्याच्या दृश्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. याचे चित्रीकरण होत असतान संपूर्ण टीमने धम्माल केली.”  

टॅग्स :जिजाजी छत पर हैसोनी सब