Join us

'साप आणि सापाचं विष मागवलं', अखेर एल्विश यादवने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला; आता पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 12:50 IST

एल्विश यादवला किती दिवस कोठडी? नक्की प्रकरण काय?

'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता युट्यूबर एव्हिश यादवला (Elvish Yadav) १७ मार्च रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एल्विशने पोलिसांसमोर गुन्हा मान्य केला. रेव पार्ट्यांसाठी त्याने साप आणि सापाचं विषय मागवलं होतं. एल्विशने कायम ही गोष्ट कबूल करण्यास नकार दिला होता. पण काल अखेर अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांसमोर ही गोष्ट मान्य केली. 

26 वर्षीय युट्यूबर एल्विश यादव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. साप हातात धरल्याचे त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. रेव पार्ट्यांमध्ये सापाचं विष नशा म्हणून वापरण्यात येते. एल्विश आणि त्याच्या साथीदारांनी याची ऑर्डर दिली होती. सुरुवातीला एल्विशने हे आरोप फेटाळून लावले होते. तसंच पोलिसांनी जर आरोप सिद्ध केले तर मी नाचेल असंही तो म्हणाला होता. आता त्याने स्वत:च आरोप मान्य केले आहेत. 

रिपोर्टनुसार, एल्विशने कबूल केले की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो नोएडा येथे इतर आरोपींना भेटला होता ज्यांना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. नोएडा पोलिसांनी २ नोव्हेंबरला एका बँक्वेट हॉलमध्ये धाड टाकली आणि ५ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून साप आणि विष जप्त करण्यात आलं होतं.

काल १७ मार्च रोजी न्यायालयाने एल्विशची नोएडा लुक्सर तुरुंगात रवानगी केली. त्याला क्वारंटाईन बराकमध्ये ठेवण्यात आले असून जमिनीवरच झोपायला लावलं. जेवणात त्याला पुरीभाजी, हलवा देण्यात आला जो रविवारचा मेन्यू होता. न्यूज रिपोर्टनुसार आज किंवा उद्या पर्यंत त्याला जामीन मिळावा म्हणून त्याचे वकील प्रयत्न करत आहेत.

चार दिवसांपूर्वीच एल्विश यादव ISPL मध्ये सहभागी झाला होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना ISPL ला हजेरी लावली होती. स्वत: क्रिकेट खेळले तसंच ते टीमचे मालकही होते. एल्विशसोबत बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीही होता. एल्विशच्या अटकेनंतर मुनव्वर फारूकीने प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :बिग बॉसपोलिसअटकसाप