प्रसिद्ध यूट्युबर आणि बिग बॉस ओटीटी ३ विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या 'लाफ्टर शेफ' या रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तो आपल्या स्वयंपाकाने जजना प्रभावित करताना दिसतो आहे. या शोमध्ये प्रियंका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) देखील त्याच्यासोबत दिसत आहे. या शोमध्ये त्यांच्यात छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. त्यानंतर अशी चर्चा रंगली होती की एल्विश आणि मन्नारा एकमेकांना डेट करत आहेत. आता एल्विशने या चर्चेवर आपले मौन सोडले आहे.
खरेतर एल्विश यादव हे देखील यूट्यूबवर एक प्रसिद्ध नाव आहे. त्याच्या व्लॉगिंग चॅनेलशिवाय, त्याचे पॉडकास्ट चॅनेलदेखील आहे. जिथे तो स्टार्सच्या मुलाखती घेतो. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये एल्विश स्वतःची मुलाखत घेताना दिसला. ज्यामध्ये तो विचारतो की, तुझे मन्नारा चोप्रासोबत अफेअर होते आणि तिने तुला 'लाफ्टर शेफ २' मध्ये एंट्री करून दिली? एल्विश स्वतः या प्रश्नाचे उत्तर देतो आणि म्हणतो, 'हे अगदी खरे आहे की माझे मन्नारासोबत अफेअर आहे आणि तिने मला शोमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. तिने मला क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
कोणाला डेट करतोय एल्विश?एल्विशने हा व्लॉग अतिशय मजेदार पद्धतीने बनवला आहे. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांना खात्री पटली की त्याचा मन्नाराशी कोणताही संबंध नाही. खरेतर, काही काळापूर्वी एल्विशने शोमध्ये खुलासा केला होता की तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे. जरी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितलेले नाही.
वर्कफ्रंटएल्विश यादवच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, पूर्वी तो यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचा. तिथून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने बिग बॉस ओटीटीमध्ये भाग घेतला आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतरही त्याने शोची ट्रॉफी जिंकली. यानंतर तो अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसला.