Join us

धीरज धूपरला गवसली त्याची खरी नायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 6:37 AM

‘कुंडली भाग्य’मधील धीरज धूपर म्हणाला, “ज्या महिलेचा स्वत:वर विश्वास आहे आणि जी आपली स्वप्नं पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगते,ती माझ्या ...

‘कुंडली भाग्य’मधील धीरज धूपर म्हणाला, “ज्या महिलेचा स्वत:वर विश्वास आहे आणि जी आपली स्वप्नं पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगते,ती माझ्या मते एक आदर्श महिला आहे.आपल्या देशात महिला आपली स्वप्नं सोडून देतात किंवा त्यांच्या खांद्यावर टाकलेल्या अनेक जबाबदा-यांच्या ओझ्याखाली ती पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही.पण जी महिला सर्व जबाबदा-या पार पाडते आणि सर्व अडचणींवर मात करूनही आपली स्वप्नं साकार करते,ती माझ्या मते खरी नायिका आहे.मला जिच्यापासून मोठी प्रेरणा मिळते,ती स्त्री आहे एकता कपूर.आज ती एक यशस्वी उद्योजिकाही आहे.टीव्हीवरील मालिकांची सम्राज्ञी बनण्यापर्यंत तिने घेतलेली झेप ही तिने स्वबळावर घेतली असून त्यामुळे ती अनेकांसाठी एक प्रेरणेचा स्रोतही बनली आहे.माझा समानतेवर विश्वास असून माझ्या आयुष्यातील स्त्रीचे अस्तित्त्व मला दैनंदिन जीवनात जाणवते.महिलांना शर्तविना प्रेम आणि आदर देण्याची प्रत्येक संधी आपण स्विकारली पाहिजे.तो त्यांचा हक्कच आहे.”मानसी साळवी-ओ अपना सा‘वो… अपना सा’मधील मानसी साळवी म्हणाली,“समाजाने तयार केलेल्या प्रतीकात्मक साच्यात स्वत:ला महिला ही आदर्श महिला ठरत नाही,तर हे साचे मोडीत काढून तिच्यासारख्या अनेक जणींसाठी जी नवी वाट निर्माण करते,ती माझ्या मते खरी आदर्श महिला आहे.मी स्वत:लाच प्रेरणा देते,माझा संघर्ष मला प्रेरणा देतो,माझं अपयशही मला प्रेरणा देतं आणि माझ्या चुकाही मला अधिक मजबूत करतात.प्रत्येक छोटीमोठी कामगिरी मला त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. वाटेतील सर्व अडथळे दूर सारण्याची आणि स्त्रीची ठरावीक,साचेबध्द प्रतिमा मोडीत काढण्याची प्रेरणा देते.एक महिला म्हणून मी माझं आयुष्य एन्जॉय करते.महिला असणं म्हणजे पुरुषांना छोटं लेखणं नव्हे,तर जीवनातील आपला उद्देश आणि हेतूचा शोध घेणं आणि जीवनावर आपला ठसा उमटविणं हे महिला असण्याचं खरं उद्दिष्ट आहे.”करण जोटवाणी- आपके आ जाने से‘आपके आ जाने से’मधील करण जोटवाणी सांगतो,“माझी आई ही माझी सर्वात मोठी प्रेरणाशक्ती आहे.तिने आजवर केलेली अपार मेहनत आणि आज या उतारवयातही हार न मानण्याची तिची वृत्ती मला नेहमीच बळ देते.माझ्या जीवनात आलेल्या सर्व महिलांचा मी आदर करतो.मला घडवण्यात ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महिलांचे मी यानिमित्त आभार मानतो.”