Join us  

'बिग बॉस १८'मध्ये 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकरची एन्ट्री? आतापर्यंत ही नावं आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:57 AM

Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' लवकरच भेटीला येणार आहे. शो सुरू होण्याचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतसे सेलिब्रिटींची नावेही समोर येत आहेत.

'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) लवकरच भेटीला येणार आहे. शो सुरू होण्याचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतसे सेलिब्रिटींची नावेही समोर येत आहेत. आता बातमी अशी आहे की समीरा रेड्डीनंतर अभिनेत्री आणि बिझनेसवुमन ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) देखील सलमान खानच्या शोमध्ये दिसू शकते. 'बिग बॉस १८'साठी तिचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. ईशा कोप्पीकर अलीकडेच प्रसिद्धी झोतात आली जेव्हा तिने एका मोठ्या अभिनेत्यासोबत कास्टिंग काउचची घटना सांगितली. मात्र, तिने अभिनेत्याचे नाव सांगितले नाही.

'बिग बॉस'चा १८वा सीझन ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे आणि आतापर्यंत अनेक टीव्ही स्टार्स, फिल्म स्टार्स आणि यूट्यूबर्सकडून संपर्क साधल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत. ईशा कोप्पीकर गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट आणि अभिनयाच्या दुनियेपासून दूर आहे. पण आता तिला तिच्या करिअरला दुसरी संधी द्यायची आहे. 'बिग बॉस खबरी' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटने अपडेट शेअर केले आहे की ईशा कोप्पीकर 'बिग बॉस १८' ची कन्फर्म स्पर्धक आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेली नाही.

या सेलिब्रिटींची नावे आली आहेत समोरआत्तापर्यंत, ज्या स्पर्धकांची नावे पुष्टी केली गेली आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधला गेला आहे. यात तहलकाची पत्नी दीपिका आर्या, जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ, फैसल शेख उर्फ ​​मिस्टर फैसू, समीरा रेड्डी आणि दलजीत कौर. आजकाल दलजीत तिचा दुसरा पती निखिलपासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आहे आणि दोघेही एकमेकांवर सार्वजनिकरित्या आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यावेळी 'बिग बॉस १८' होस्टसोबत अब्दू रोजिक दिसणार आहे. तो सलमानसोबत शोचे काही खास भाग होस्ट करताना दिसणार आहे.

टॅग्स :इशा कोप्पीकरबिग बॉस