प्रसिद्ध बॉलिवूड कोरियोग्राफर टेरेंस लुईस(Terence Lewis)ने नुकतेच रिअॅलिटी शोबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, रिअॅलिटी शो नेहमीच स्क्रीप्टेड असतात. नुकत्याच एका मुलाखतीत टेरेंसने अनस्क्रीप्टेड कॉम्पिटिशनमागचे वास्तव सांगितले आहे. तो म्हणाला की, टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांसाठी कसे जाणूनबुजून मोमेंट्स बनवले जातात. तो पुढे म्हणाला की, हे क्षण आधीपासूनच प्लान केलेले असतात. सध्या टेरेंस लुईस इंडियाज बेस्ट डान्सर ४ या रिॲलिटी शो जज करत आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत, कोरिओग्राफरला चेन्नई एक्सप्रेसच्या प्रमोशन दरम्यान डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सवर दीपिका पदुकोणसोबत नृत्य करतानाचा जुना फोटो दाखवण्यात आला. फोटोवर प्रतिक्रिया देताना, त्याने सांगितले की, असे क्षण क्वचितच अचानक घडतात परंतु प्रत्यक्षात ते आधीच प्लान केलेले असतात. तो पुढे म्हणाला, "आम्हाला नाचायचे आहे असे बरेच लोक गृहीत धरतात, परंतु वास्तविकता अशी आहे की आम्हाला हे क्षण तयार करण्यास सांगितले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही विचारता की गोष्टी स्क्रिप्टेड आहेत का ? होय, पाहुणे आणि स्पर्धकांसोबतचा संवादाचं प्लानिंग केले जाते. परंतु, जजमेंट, टॅलेंट आणि कमेंट प्रामाणिक असतात. परंतु कोणतीही गोष्ट जी एक उत्कृष्ट प्रोमो क्षण बनवते? ती स्क्रिप्टेड असते.
''टीआरपी वाढवण्यासाठी...''
टेरेन्सने खुलासा केला की, त्याला स्टेजवर एक नाट्यमय क्षण तयार करण्यास सांगितला होता. दीपिकासोबतच्या त्याच्या डान्स व्हिडिओची आठवण करून देताना तो म्हणाला, त्या क्षणी त्याला इम्प्रोव्हाइज करावे लागले आणि अभिनेत्रीला हे माहित नव्हते. टेरेन्स म्हणाला की, पुरुष जज अभिनेत्रींना रंगमंचावर येण्यास मदत करतात. टेरेन्सने त्याला पूर्णपणे स्क्रिप्टेड म्हटले. त्याने स्पष्ट केले की, "मी असे कधीच करणार नाही. माझ्या आठ वर्षांच्या जजिंग कारकिर्दीत, मी कधीही कोणत्याही स्पर्धकाला किंवा सेलिब्रिटीला अशाप्रकारे स्टेजवर बोलावले नाही. त्याने इंडियाज बेस्ट डान्सरची एक घटना शेअर केली जिथे त्याला टीआरपी वाढवण्यासाठी एक क्षण तयार करण्यास सांगितला होता.
''शेवटी प्रेक्षकांनाच दोष दिला पाहिजे कारण...''
त्याने या कल्पनेला विरोध केला असला तरी, जेव्हा निर्मात्यांनी त्याला असा डेटा दाखवला ज्यात असे भावनिक, हलके-फुलके क्षण प्रेक्षकांना आकर्षित करतात, तेव्हा त्याला शोबिझचे वास्तव स्वीकारावे लागले. शेवटी टेरेन्स म्हणाला, "हे सांगणे दु:खद आहे पण बहुतेक रेटिंग मजेशीर क्षणांवरून येतात. त्यामुळे शेवटी प्रेक्षकांनाच दोष दिला पाहिजे कारण ते त्याचा आनंद घेतात."