Join us

"बिग बॉस 16 नंतर मला कामच मिळालं नाही" महिला स्पर्धकाने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 15:41 IST

बऱ्याच संघर्षानंतर तिला एकता कपूरची सीरिज मिळाली आहे.

'बिग बॉस' (Bigg Boss) हा टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो. १६ ते १७  स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी होतात. बाहेरच्या जगाशी कोणताही संबंध नसताना सर्व स्पर्धक घरात एकत्र राहतात. त्यांच्यातील रोजची भांडणं प्रेक्षकांचं कायम मनोरंजन करतात. तसंच होस्ट सलमान खान नेहमीच त्याच्या स्टाईलमध्ये स्पर्धकांना धारेवर धरत असतो. या शोमुळे स्पर्धकांना प्रसिद्धी तर मिळतेच तसंच बाहेर आल्यानंतर सिनेमा किंवा इतर रिअॅलिटी शोही मिळतात. मात्र काही स्पर्धक बाहेर आल्यानंतरही कामासाठी वणवण फिरतात. 'बिग बॉस 16' मधील एका महिला स्पर्धकाने कामच न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.

बिग बॉस 16 वा सिझन भलताच गाजला होता. एम सी स्टॅन या सिझनचा विजेता ठरला. तर अब्दु, अर्चना, प्रियंका चहर, शिव ठाकरे अशा अनेक स्पर्धकांमुळे  सिझनमध्ये मजा आली. शिव ठाकरेची 'मंडली' खूपच प्रसिद्ध झाली. या सिझनमध्ये प्रियंका चहर (Priyanka Chahar) तिसरी रनर अप होती. ईटाईम्सशी बोलताना प्रियंका म्हणाली, "मी बऱ्याच काळापासून नवीन प्रोजेक्ट्साठी ऑडिशन देत आहे. पण हे अजिबातच सोपं नाही. टीव्ही कलाकरांना लवकर सिनेमे किंवा वेब सीरिज मिळत नाही. यामागे नक्की काय कारण आहे हे माहित नाही."

प्रियंकाला आता कुठे एकता कपूरची एक वेब सीरिज मिळाली आहे. 'दस जून की रात' मध्ये ती झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत तुषार कपूरही आहे. याबद्दल तिने जास्त माहिती दिलेली नाही मात्र अखेर वेब शो मिळाला असं म्हणत तिने सुटकेचा विश्वास टाकला आहे. 

टॅग्स :बिग बॉसवेबसीरिजसिनेमासोशल मीडिया