Join us

स्पर्धकांआधी परीक्षक थिरकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2016 12:54 PM

झलक दिखला जा या कार्यक्रमाची उत्सुकता प्रेक्षकांना चांगलीच लागलेली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या ...

झलक दिखला जा या कार्यक्रमाची उत्सुकता प्रेक्षकांना चांगलीच लागलेली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेत्री जॅक्लिन फर्नांडिस, निर्माता करण जोहर आणि कोरिओग्राफर गणेश हेगडे परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात स्पर्धकांच्या आधी परीक्षकांनी आपले नृत्य सादर केले. झलकच्या सेटवर नाचण्याची इच्छा अनेक सेलिब्रेटींना असते. परीक्षकांनीदेखील आपली ही इच्छा पूर्ण केली. जॅक्लिनच्या नृत्यावर तर सगळेच फिदा झाले होते.