Join us  

'अबीर गुलाल' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, दोन अनोळखी मुलींची नशीब बदलणारं सत्य अखेर श्रीसमोर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 2:31 PM

Abeer Gulal Serial : 'अबीर गुलाल' मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. २४ वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचं नशीब एका रात्रीत बदलले होते. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आले आहे.

कलर्स मराठी (Colours Marathi) वाहिनीवरील 'अबीर गुलाल' (Abeer Gulal Serial) ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत.दरम्यान आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. २४ वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचं नशीब एका रात्रीत बदलले होते. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आले आहे. गायकवाडांचे घर हेच आपले हक्काचे घर आहे हे अखेर श्रीसमोर येणार आहे. 

नर्समुळे गरीब घरातील शुभ्रा श्रीमंत घरात जाते तर श्रीमंत घरातील श्री गरीब घरात लहानाची मोठी होते. पण या सगळ्याला कारणीभूत असणारी नर्स श्रीला आता तिचा हक्क आणि तिच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल सांगणार आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून श्रीला मोठे धक्के मिळत आहेत. पण स्वत:ची खरी ओळख सांगणारा हा मोठा धक्का श्री पचवू शकेल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

'अबीर गुलाल' मालिकेत आलेल्या सध्याच्या ट्विस्टबद्दल श्रीला वाटतंय की,"मी जर माझा खरा हक्क मागितला तर गायकवाड आई, बाबा आणि घर सगळं मिळेल. पण शुभ्रा मॅडमचं अख्ख आयुष्यचं उद्धवस्त होऊन जाईल. शुभ्रा मॅडमच्या साखरपुड्यात कोणतंही विघ्न यायला नको. पण हे सगळं खरं ऐकून काही वेगळचं घडलं तर".श्री पुढे म्हणतेय,"माझ्यामुळे आधीच सगळ्यांना खूप त्रास झाला आहे. आई अंबाबाई कसली परीक्षा घेत आहेस? म्हणजे आयुष्यभर ज्यांची वाट पाहिली, ज्या गोष्टीसाठी मी तडफडत राहिले ते सगळं सुख, आनंद तू असा माझ्यासमोर मांडून ठेवला आहेस. पण हे सगळ्यांना कळल्यानंतर मला सगळे आपलं मानतील का? मला आपलं करुन शुभ्रा मॅडमला त्यांनी दूर केलं तर?". या सगळ्या प्रश्नांमध्ये गोंधळलेल्या श्रीचं पुढचं पाऊल काय असेल हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

टॅग्स :कलर्स मराठी