'लक्ष्मी निवास' ('Lakshmi Niwas Serial) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवास प्रत्येकाच्या घरातील सदस्य बनले आहेत. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. सध्या सिद्धूच्या लग्नाची लगबग सुरु आहे. या कार्यात सुरुवातीपासूनच इतकी विघ्ने येतायत की माहिती नाही लग्नापर्यंत काय घडेल.
सध्या एक मोठा खुलासा होतो जेव्हा सिद्धू आणि पूर्वी एकमेकांना सांगतात की त्यांना हे लग्न करायचे नाही आहे. सिद्धू खुश आहे आणि तो भावनाला सगळे सत्य सांगायचे ठरवतो. त्याचे भावनाला सत्य सांगायचे प्रयत्न सुरू आहेत. इकडे आनंदीला काहीतरी झालंय हे भावनाला जाणवते. आनंदी सुपर्णाच्या घरी आठवड्याच्या शेवटी जाते, पण आता ती गप्प आणि अस्वस्थ आहे. जेव्हा तिला प्रश्न विचारले जातात, तेव्हा ती टाळाटाळ करते. हे पाहून भावना काळजीत आहे. भावना सिद्धूला घरी बोलवते, सिद्धू आनंदीला बोलतो करतो. भावनाला वाईट वाटतंय की आनंदी तिच्याशी बोलत नाही, पण सिद्धू तिला समजावतो.
दरम्यान जयंत-जान्हवी त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश आहेत. जयंत-जान्हवीला हवं नको ते बघतोय. तर दुसरीकडे जान्हवी सुपरमार्केटला जाते आहे असं सांगून ती भावनाला भेटायला जाते. हे जयंतला कळतं आणि जान्हवी त्याचाशी खोटं बोलली याचा त्याला प्रचंड त्रास होतो. श्रीनिवास एरव्हीपेक्षा वेगळा वागतोय हे लक्ष्मीच्या लक्षात येतंय. त्याच बरोबर रिक्षेशी निगडीत असलेल्या गोष्टी तिला सापडतात, ती विचारपूस करते पण श्रीनिवास टाळाटाळ करतोय. आता सिद्धूचं सत्य काय बदल घडवेल त्याच्या आणि पूर्वीच्या नात्यात? सत्य समजल्यावर सिद्धू आणि भावनाच नातं बहरेल ? श्रीनिवासचं सत्य लक्ष्मीसमोर आल्यावर काय होईल ? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.