Join us

"निक्कीला धडा शिकवायला राखी सावंतने घरात जावं...", काय म्हणाली आर्या जाधव ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:25 PM

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली.

 Aarya Jadhao on Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'ची पाचव्या पर्वाची सध्या महाराष्ट्रभर क्रेझ आहे. प्रत्येक जण हा 'बिग बॉस' आणि 'बिग बॉस'मधील स्पर्धक यांच्याबद्दलच बोलताना पाहायला मिळतोय.  या पर्वातमध्ये जोरदार वादावादी, राडे झाले आहेत. आर्या जाधव (Aarya Jadhao) हिने निक्की तांबोळीच्या (Nikki Tamboli)  निक्कीच्या कानशि‍लात लगावल्याने तिला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, बाहेर आल्यानंतरही आर्या ही निक्कीवर निशाणे साधताना दिसतेय. 

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत आर्याने अनेक गोष्टींचे खुलासे केले. निक्कीविषयी बोलताना आर्या म्हणाली, "निक्कीला कोणी कितीही काहीही बोलो, शेवटी घाण ती घाण. मला असं वाटतं की जर तिला कोणी उत्तर देणारं आलं, तर ते पाहताना लोकांना मजा येईल. मी माझ्या पद्धतीने तिला उत्तर दिलं आणि लोक म्हणाले की ही नडू शकते निक्कीला. तिच्या तोंडातून जी घाण, जे शब्द निघतात, त्यांना थोपवण्यासाठी राखी सावंत पाहिजे.  मी तिच्याशी नडले, पण कुठे तरी मला वाटतं होतं की मी तेवढी वाईट नाही होऊ शकत. मी तसे नाही बोलू शकतं. पण राखी ते करू शकते. तिने घरात गेलं पाहिजे".

याशिवाय मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तर देताना आर्याने निक्कीला सणसणीत ठेवून दिल्याची कबुली दिली. आर्याने म्हटलं की, "मी तिला खूप जोरात ठेवून दिली. पण आता मला या गोष्टीची लाज वाटतेय. कारण कुणावरही हात उगारणं चुकीचंच आहे. अर्थात ते काही क्षणात सगळं घडलं. मी तेव्हाही म्हटलं की, मी निक्की नाहीये तर ते माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे. पण जरी हिंसा चुकीची असली तरीही निक्की ते सगळं डिसर्व्ह करते".  आर्याने बिग बॉस मराठी टॉप ३ स्पर्धक सांगताना अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर यांची नावे घेतली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीराखी सावंत