Exclusive : राजेश शृंगारपुरे अन् रेशम टिपणीसमधील रोमान्स वादाच्या भोवऱ्यात; विधीच्या विद्यार्थ्याने केली ‘बिग बॉस मराठी’विरुद्ध तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 12:13 PM
- सतीश डोंगरेकलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो सर्वच अर्थाने वादग्रस्त ठरताना दिसत आहे. ...
- सतीश डोंगरेकलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो सर्वच अर्थाने वादग्रस्त ठरताना दिसत आहे. घरातील सदस्यांमधील वाद अतिशय विकोपाला जाताना दिसत असून, शोदरम्यान काही आक्षेपार्ह दृश्यही समोर आले आहेत. विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम सेठ टीपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला जात असल्याचे दिसत आहे. नाशिकमध्ये एनबीटी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाºया एका विद्यार्थ्याने तर थेट कलर्स मराठी वाहिनीच्या सर्व संचालकांविरोधातच तक्रार करताना शोदरम्यान, प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीच्या चौकशीची मागणी केली आहे. ऋषिकेश बळवंत देशमुख असे तक्रार करणाºया विद्यार्थ्याचे नाव असून, त्यांनी याबाबतचा तक्रार अर्ज नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना दिला आहे. या तक्रार अर्जानुसार, त्यांनी कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाºया बिग बॉस मराठी या मालिकेतील प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीबाबत चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रार अर्जात ऋषिकेश देशमुखने नमूद केली की, १४ मे २०१८ रोजी मी नियमितप्रमाणे दैनंदिन कामकाज आटपून कुटुंबीयांसमवेत निवांत वेळेत टीव्ही बघत होतो. कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी’ या शोबद्दल केलेल्या जाहिरातीवरून मला शोची माहिती मिळाली. या जाहिरातीत कलर्स मराठी या वाहिनीने प्रेक्षकांना हा शो बघण्याचे आवाहन केले होते. हा शो रात्री ९.३० वाजेदरम्यान प्रसारित केला जातो. सदर दिवशी हा शो सुरू असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास शोमधील कलाकार राजेश शृंगारपुरे व रेशम सेट टिपनीस यांचे प्रेमाचे संवाद सुरू झाले. काहीवेळानंतर दोघांमध्ये सुरू असलेला संवाद अश्लीलतेकडे गेला. पुढे राजेश शृंगारपुरेने रेशम टिपणीसला आलिंगन देऊन आम्ही आजपासून एकाच बिछान्यात झोपणार आहोत असे इतरांना सांगितले. पुढे हे दोघे एकमेकांशी शारीरिक अंगलट करू लागले. एकमेकांना आलिंगन देत, चुंबन घेत अश्लील शारीरिक अंगलटपणा करू लागले. त्यांच्यातील संवाद आणि शारीरिक कृत्य अतिशय आक्षेपार्ह होते. तक्रारित पुढे म्हटले की, वास्तविक हे दोन्ही कलाकार विवाहित आहेत. त्यांना मुले असून, त्यांचा परिवार आहे. मात्र अशातही विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालण्याचे दृश्य दाखविण्याचे कृत्य वाहिनीद्वारे केले गेले. सदर कार्यक्रम माझे सर्व कुटुंबीय पाहत असताना वरील दोन्ही कलाकारांमध्ये सुरू असलेल्या व वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या अशोभनीय व अश्लील प्रसारणामुळे अतिशय लज्जास्पद भावना निर्माण झाल्या. अशाप्रकारची दृश्य आपल्या संस्कृतीला काळीमा फासणाºया असून, संबंधितांवर याबाबत कारवाई व्हायलाच हवी. वाहिनीचे सर्व संचालक, राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस, शोचे निर्माते यांच्यासह सर्व ज्ञात- अज्ञाताविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ व ६७ अ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर शोच्या संदर्भात काय कारवाई केली जाईल? किंवा शोच्या निर्मात्यांकडून याबाबतचे काय स्पष्टीकरण दिले जाईल? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.