Join us

khushboo Tawde Exclusive : मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी

By तेजल गावडे | Updated: August 9, 2024 15:36 IST

khushboo tawde या अभिनेत्रीचा नवरादेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यांना एक मुलगा असून ते लवकरच दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून ती लवकरच चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर करणार आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे सारं काही तिच्यासाठी मालिकेतील उमाई म्हणजेच खुशबू तावडे (Khushboo Tawde). होय. हे खरंय. ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून ती दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. 

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्या दोघांनी २०१८ साली लग्न केले. त्या दोघांना तीन वर्षांचा मुलगा आहे, ज्याचं नाव ठेवलंय राघव. त्याचा जन्म २ नोव्हेंबर, २०२१ मध्ये झाला. आता हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

खुशबू तावडेची मालिकेतून एक्झिट दरम्यान, सध्या खुशबू तावडे सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करताना दिसत आहे. तिने साकारलेली उमा खोत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मात्र आता ती मालिकेतून बाहेर पडली आहे. प्रेग्नेंसीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे आणि लवकरच ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.  आता उमाच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी