Join us

Exclusive: झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका लवकरच घेणार निरोप

By तेजल गावडे | Updated: August 28, 2024 17:29 IST

Zee Marathi Serial : झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर 'सावळ्याची जणू सावली' ही नवीन मालिका लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. दरम्यान आता अशी माहिती मिळते आहे की, झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका कोणती आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi). वर्षाभरापूर्वी आलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे.

झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडी घडताना दिसल्या. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडे प्रेग्नेंट असल्यामुळे बाहेर पडली. त्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री पल्लवी वैद्यची वर्णी लागली. मालिका सुरळीत सुरू असताना आता मालिका निरोप घेणार असल्याची माहिती मिळते आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत मालिकेचं शूटिंग संपणार असल्याचे समजते आहे. 

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत रंजक वळणसारं काही तिच्यासाठी मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. रक्षाबंधनादिवशी लालीला तिची चूक कळते आणि ती दादांची माफी मागते. त्यांना राखी बांधून त्यांना पुन्हा खोतांच्या घरात घेऊन येते. त्यामुळे पुन्हा एकदा खोतांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे निशी प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट मेघनाला कळते. ती तिचे मुल पाडण्याचा कट रचते. पण तिचा हा प्लान निशीसमोर उघडकीस येतो. त्यामुळे आता मेघनाचे कट कारस्थान सर्वांसमोर येईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :झी मराठी