Join us

ये प्यार नहीं तो क्या है फेम ​नमित खन्ना देतोय सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 9:42 AM

‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत सिद्धान्त सिन्हाच्या भूमिकेतून भारतीय टेलिव्हिजनवर आकर्षक एंट्री करणार्‍या नमित खन्नाने सार्‍यांचे लक्ष ...

‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत सिद्धान्त सिन्हाच्या भूमिकेतून भारतीय टेलिव्हिजनवर आकर्षक एंट्री करणार्‍या नमित खन्नाने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मॉडेल म्हणून नमितने त्याच्या करियरला सुरुवात केली होती. तो त्याच्या मॉडलिंगच्या दिवसापासूनच अत्यंत शिस्तप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. डाएटचे तर तो कडक पालन करतो, फिटनेससाठी नियमित व्यायाम करतो आणि चित्रीकरणासाठी अगदी वेळेत हजर असतो.‘ये प्यार नहीं तो क्या है’ या मालिकेच्या आगामी भागात सिद्धान्त सिन्हा (नमित खन्ना) ड्रग्ज घेऊन वाहन चालवण्याबाबतची एक केस लढवताना दिसणार आहे. पडद्यावर एक चतुर आणि चाणाक्ष वकिलाची भूमिका साकारत असलेला सिद्धान्त आपल्या अपराधी असलेल्या अशीलाच्या वतीने केस जिंकतो. प्रत्यक्ष जीवनात मात्र नमितचे विचार याच्या अगदी विपरीत आहेत. त्याचा हा ठाम विश्वास आहे की, नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नियम असणे महत्त्वाचे आहेत आणि सर्व परिस्थितींमध्ये त्यांचे पालन हे व्हायलाच हवे. तरुणांमध्ये शिस्त असली पाहिजे असे त्याला वाटते. कारण तरुण वर्ग साहसाच्या नावाखाली नियम मोडण्यास आणि स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालण्यास उद्युक्त होत असतो. याविषयी नमित सांगतो, “ड्रग्ज घेऊन गाडी बेफाम चालवणारे अनेक लोक आपला आणि त्यासोबतच अनेकांचा जीव धोक्यात घालतात. ट्रफिकचे नियम न पाळता गाडी चालवण्याच्याबाबतीत दिल्लीचा नंबर पहिला आहे. आजच्या तरुण पिढीत पार्टी करण्याचे आणि रात्री बाहेर भटकण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पण त्यासोबतच आपण अधिक जबाबदार आणि जागरूक असणे देखील गरजेचे आहे. ड्रग्ज घेणे हे आजच्या तरूणांत स्टाइलचे लक्षण होऊन बसले आहे आणि ते धोक्याचे आहे. इजा तुम्हाला अश्रू देते आणि सुरक्षा आनंद. ‘बस एक छोटी सी आस है, ना जाने कहीं ना कहीं कोई आपका खास है’ – शिस्तबद्ध रहा, समंजस रहा आणि सुरक्षित रहा!”Also Read : ​ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेमुळे नमित खन्ना आणि अंकित राज या जुन्या मित्रांची झाली पुन्हा भेट