Join us

प्रसिद्ध कपल घटस्फोट घेण्याच्या तयारीत, वयाच्या २१ व्या वर्षी ८ वर्ष मोठ्या अभिनेत्रीबरोबर केले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 3:27 PM

घटस्फोट घेण्याचा निर्णय कोण्या एकट्याचा नसून परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दोघेही तयार असल्याचे पंकित ठक्करने म्हटले आहे.

रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत.

अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. 'आपकी नजरों ने समझा' फेम अभिनेता पंकित ठक्कर पत्नी प्राची ठक्करसोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. पाच वर्षांपासून दोघेही वेगवेगळेच राहत आहेत. दोघेही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहेत. कोरोना संपल्यानंतर लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे पंकितने सांगितले आहे. 

पंकितने त्याच्या नात्याविषयी बोलताना सांगितले की, 2015 पासून आम्ही वेगळेच राहत आहोत आणि आता आम्ही दोघेही आपापल्या जीवनात आनंदी आहोत. आम्ही आजही एकमेकांचा आदर करतो. आमच्या नात्याचा मुलावर परिणाम होऊ देणार नसल्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. माझ्या मुलाने आईबरोबर राहण्यास माझी काहीच हरकत नाही.आई मुलाचे नात्याची मला जाण आहे. घटस्फोट घेण्याचा निर्णय कोण्या एकट्याचा नसून परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दोघेही तयार आहोत.

प्राची आणि माझे नाते टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला.पण आमच्या दोघांच्या नात्यामुळे कुटुंबही आनंदित नव्हते.आमच्या दोघांमध्ये असलेले अंतर हेच आम्हाला वेगळे करण्साठी कारणीभूत ठरले असावे. प्राची माझ्यापेक्षा ८ वर्षाने मोठी आहे.त्यामुळे कुटुंबाला आधीपासून आमचे हे नाते मान्य नव्हते. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेही खरंच आहे. 

मी कुटुंबाच्या विरोधात जाऊन वयाच्या २१ व्या वर्षीच लग्न केले होते. त्यावेळी मी करिअरच्या यशशिखरावर होतो. हिच योग्य वेळ असल्याचे वाटायचे कारण, ज्या ज्या गोष्टींची स्वप्न मी पाहिली होती त्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या होत्या.आयुष्यात कधी कधी काही गोष्टींसाठी घेतलेले निर्णय चुकतात. पण आज त्या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नसल्याचेही पंकितने म्हटले आहे.

 

पंकित ठक्करने 'कभी सौतन कभी सहेली' आणि 'दिल मिल गया' मालिकेतून आपली ओळख निर्माण केली होती. यानंतर 'तो कसौटी जिंदगी के', 'हवन', 'सेठ जी' आणि आता 'आपकी नजरोंने समझा' मालिकेत चेतन रावलच्या भूमिकेत तो झळकत आहे.