Join us

पनवेलच्या बसस्टॉपवर रात्र काढणाऱ्या मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्यानं मुंबईत घेतलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:19 AM

या अभिनेत्याने आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना खळखळून हसविले आहे.

आपली स्वप्न उराशी बाळगून कलेच्या नगरी म्हणजेच मुंबापुरीत बरेच लोक येत असतात. इथे येणाऱ्या काहींचा प्रवास सोप्पा असतो तर काहींचा खडतर. बऱ्याचदा लोकांना मुंबईच्या रस्त्यावरच राहून आपल्या स्वप्नांचा मागोवा घ्यावा लागतो. असा संघर्ष करीत यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले बरेच कलाकार आहेत. तसाच एक मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आहे ज्याने पनवेलच्या बसस्टॉपवर रात्र काढून संघर्ष करून आज प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. हा अभिनेता म्हणजे चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे.

चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे याने नुकतेच मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. ही माहिती त्याचा सहकलाकार व मित्र कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने त्याच्या घरातला त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, काही वर्षांपूर्वी पनवेलच्या बस स्टाॅपवर रात्र काढणाऱ्या मित्राला त्याच्या मुंबईल्या स्वत:च्या घरासाठी खुप खुप शुभेच्छा. डॉक्टर तुझं अभिनंदन आणि जिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्या गौरीचही खरं कौतुक.

निलेश साबळे पुण्यातील सासवड इथला असून त्याने झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला आणि विजेताही झाला.

त्यानंतर होम मिनिस्टर, फू बाई फू या रिएलिटी शोजमध्ये तो झळकला. याशिवाय नवरा माझा भवरा, बुद्धीबळ, एक मोहर अबोल या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.  

टॅग्स :निलेश साबळेचला हवा येऊ द्या