Join us

'सारेगमप लिटिल चॅम्प'मधील गायिका राशी पगारेची बहीणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 7:00 AM

सारेगमप लिटिल चॅम्प या सिंगिंग रिएलिटी शोचे नवीन पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प या सिंगिंग रिएलिटी शोचे नवीन पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सारेगमप लिटिल चॅम्पमधील बालगायक अगदी सुरेल गाताना दिसत आहेत. आधीच्या पर्वातील उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेले गायक आताच्या पर्वाचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. जुने आणि नवीन बाल गायक एकत्र आल्यामुळे या शोमध्ये नाविण्य आले आहे. आर्या, कार्तिकी, मुग्धा, प्रथमेश आणि रोहित हे पंचरत्न परीक्षक तर तर मृण्मयी देशपांडे ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडते आहे. 

सारेगमप लिटिल चॅम्प शोमधील स्पर्धक राशी पगारे पहिल्याच गाण्यात स्केटिंग करत मी आले निघाले… गाणे म्हणत तिने प्रेक्षक तसेच परीक्षकांची मने जिंकली. राशी पगारे हिला मराठीसोबत ७-८ भाषेत गाणे गाता येता येत असल्याचे तिने सांगितलं होत.

राशी पगारे ही नाशिकची असून पंकज पगारे यांची ती मुलगी. पंकज पगारेंना दोन मुली आहेत ती म्हणजे एक राशी आणि दुसरी सृष्टी. या दोघीनींही सूर नवा ध्यास नवा या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. सृष्टी ही सूर नवा ध्यास नवा या शोमध्ये खूपच लोकप्रिय ठरली होती. शोच्या टॉप टेन स्पर्धकांपर्यंत तिने मजल मारली होती.

त्यानंतर सृष्टीला स्वामिनी मालिकेत माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारायला मिळाली. या मालिकेत सृष्टीने केलेल्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

दोघी बहिणी गायिका असून स्टेजवर लाइव्ह फरफॉर्मन्स देखील करतात. अगदी लहान वयापासून दोघींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.

स्वामिनी मालिकेतील रमाबाईंच्या भूमिकेमुळे सृष्टी पगारे हिला खरी ओळख मिळाली असल्याचे ती सांगते. 

टॅग्स :सा रे ग म पमृण्मयी देशपांडे