टीव्ही मालिकांमध्ये दिसणारे कलाकार हे प्रेक्षकांच्या नेहमीच जवळचे असतात. या कलाकारांना रोज टीव्हीवर पाहत असल्यामुळे ते प्रेक्षकांना अगदी घरातल्या सारखे वाटू लागतात. अशीच टीव्ही इंडस्ट्रीमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री लवकरच आई (Pregnancy Announcement) होणार आहे. Qubool Hai 2.0 यात सना शेख हे पात्र साकारलेली गुरप्रीत बेदी (Gurpreet Bedi) पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
अभिनेत्री लग्नाच्या ३ वर्षानंतर आई होणार आहे. तिने आपल्या नवऱ्यासोबत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये गुरप्रीत व तिचा नवरा फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. गुरप्रीतच्या या फोटोवर तिचे कुटुंबीय, इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करतायत.
गुरप्रीत बेदी आणि तिचा पती कपिल आर्य यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. त्यांनी २०२१ मध्ये करोनाच्या साथीत लग्न केलं होतं. गुरप्रीतची प्रसूती पुढील महिन्यात म्हणजे येत्या मार्च महिन्यात होणार आहे. गुरप्रीतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची 'श्रीमद रामायण'मध्ये झळकली होती. तर त्याआधी तिनं 'परमावतार श्री कृष्णा', 'काठमांडू कनेक्शन', 'Qubool Hai 2.0', 'प्यार के सात वचन धर्मपत्नी', 'रक्तांचल', 'दिल ही तो है', 'लौट आओ त्रिशा' याा मालिकांमध्ये काम केलं आहे.