टेलिव्हिजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आलीय. दिग्दर्शक मंजुल सिन्हा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. १५ जानेवारी गोव्यात असताना मंजुल यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असताना मंजुल यांना हार्ट अटॅक आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. मंजुल यांच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला असून सर्वजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
मंजुल यांच्या निधनाने सर्वांना धक्का
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार मंजुल सिन्हा कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होते. त्यावेळी त्यांना हार्ट अटॅक आल्याने ते खाली कोसळले. वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत मंजुल यांनी अखेरचा श्वास घेतला. मंजुल यांच्या अकस्मात निधनाने त्यांचं कुटुंब शिवाय इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसलाय. टेलिव्हिजनवर अनेक लोकप्रिय मालिका बनवण्यात मंजुल यांचा हातखंडा होता.
'ये जो है जिंदगी', 'खामोश' आणि 'जिंदगी खट्टी मीठी' अशा मालिकांचं दिग्दर्शन मंजुल सिन्हांनी केलंय. या मालिका खूप लोकप्रिय झाल्या. मंजुल यांच्यावर गोव्यामध्येच अंत्यसंस्कार होणार असून मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करणार आहे.