'बिग बॉस मराठी ५'मध्ये सुप्रसिद्ध किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांची एन्ट्री झालीय. पुरुषोत्तम हे मठाधिपती असून आळंदीतील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत. रितेश देशमुखने माऊली म्हणत पुरुषोत्तम दादा पाटील यांचं स्वागत केलं. पुरुषोत्तम दादा पाटील यांनीही रितेश देशमुखला नमस्कार केला. किर्तनात नाचतात म्हणून पुरुषोत्तम दादा पाटील यांना सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलं.
पुरुषोत्तम दादा पाटील यांची घरात एन्ट्री
पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या एन्ट्रीच्या व्हिडीओत किर्तन करताना नाचतात म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियावर कशाप्रकारे टीका केली जातेय हे पाहायला मिळालं. घरात आल्यावर पुरुषोत्तम यांनी १० हजार बीबी करन्सीचा स्वीकार केला. रॅपची राणी आर्या जाधवसोबत पुरुषोत्तम यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. घरात आल्यावर त्यांनी मिळालेली करन्सी लॉकरमध्ये ठेवत अभंग म्हटला.
यंदाच्या बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट
यंदा बिग बॉस मध्ये काहीच मोफत मिळणार नाहीए. सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धकांना किंमत मोजावी लागणार आहे. बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी १० हजार बिग बॉस करन्सीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत पॉवर कार्डही आहे. पॉवर कार्ड घेतलं तर कोणतीही ड्युटी करण्याची गरज नाही.