Join us

'लेडीज स्पेशल'च्या सेटवर छवी पांडेचा फॅन मोमेन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:30 IST

तीन अतिशय भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचा प्रवास मांडणाऱ्या लेडीज स्पेशल कार्यक्रमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

तीन अतिशय भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचा प्रवास मांडणाऱ्या लेडीज स्पेशल कार्यक्रमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ह्या कुशल स्त्रियांनी फक्त आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवरच आपली छाप उमटवली नाही तर त्यांच्यामधील अतिरिक्त प्रतिभेने निर्मात्यांनाही थक्क केले. अश्याच एका प्रसंगात ह्या तिघींमधील एक असलेल्या छवी पांडे उर्फ प्रार्थना हिला प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी ह्यांच्यासमोर गायचे होते. पुढील कामांच्या दृष्टीने असं दाखवण्यात आलं आहे की बप्पीदा त्यांच्या पुढील अल्बममध्ये गाण्याची ऑफर द्यायला प्रार्थनाच्या घरी येतात. 

पडद्यावर आणि पडद्याबाहेर गायिका असलेल्या प्रार्थनाने (छवी पांडे) हे आव्हान त्वरित स्वीकारले. नंतर तिने निर्मात्यांना सांगितलं की तिने सुरुवातीच्या काळात संगीताच्या एका कार्यक्रमात भाग घेण्याचा प्रयत्न केला होता पण ती पहिल्या फेरीतच बाद झाली. तिच्या ह्या दडलेल्या प्रतिभेला पाहून निर्मात्यांना आश्चर्य वाटले आणि नंतर त्यांनी तिला सांगितले की बप्पीदा सेटवर येणार आहेत आणि तिला त्यांच्यासमोर गायचे आहे. ती उत्सुक होती पण त्याचबरोबर तिला दडपणही आलं होतं कारण ती लहान असल्यापासून त्यांची गाणी ऐकत होती आणि त्यांच्यासमोर गायचे आहे. ह्या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती गाणी शिकली असली तरी ह्यासाठी तिने काही दिवस सलग सराव केला. "बप्पीदांसमोर गाणे म्हणणे हा आनंददायी अनुभव होता. कार्यक्रमातील ह्या गोष्टीला मी कायम लक्षात ठेवणार आहे. बप्पीदा इतर संगीतकारांपेक्षा वेगळे असल्याने मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. त्यांचा 'ऑरा' खूपच छान आहे." उत्साहित झालेली छवी सांगत होती. लेडीज स्पेशलमधील प्रार्थनाला दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हजनवर पहा.

टॅग्स :लेडीज स्पेशलबप्पी लाहिरी