Join us

लंडनमध्ये गौरव आणि मेघाला भेटले त्यांचे फॅन, मग घडले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 17:54 IST

स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये कृष्णा (मेघा चक्रबोर्ती) चे लंडनला जायचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे आणि तिने आपला पती राधे (गौरव सरीन) सोबत आपल्या ह्या प्रवासाला सुरूवात केली आहे

ठळक मुद्देलंडनमध्ये शूटिंग सुरु असताना दोघांना चाहत्यांनी घेरले अखेर लंडनला आल्याचा आनंद दोघांनी व्यक्त केला

स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये कृष्णा (मेघा चक्रबोर्ती) चे लंडनला जायचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे आणि तिने आपला पती राधे (गौरव सरीन) सोबत आपल्या ह्या प्रवासाला सुरूवात केली आहे. लंडनमधील एका व्यस्त रस्त्यावर चित्रीकरण करताना या दोघांनाही काही चाहत्यांनी अक्षरशः घेरले आणि त्यांच्यासोबत सेल्फीज काढल्या.

याबद्दल गौरव म्हणाला, “मी आणि मेघा लंडनमधील एका प्रसिद्ध रस्त्यावर चित्रीकरण करत होतो आणि काही चाहते आमच्याभोवती आले आणि त्यांनी आमच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. आम्हीही खूप खुश झालो आणि त्यांच्यासोबत अनेक सेल्फी काढल्या. त्यांना आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि आमचा परफॉर्मन्स खूप आवडत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही अखेर लंडनला आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यातूनच आमच्या शो चे भारत आणि विदेशातीलही यश दिसून येते.” ह्याबद्दल मेघा म्हणाली, “मी ह्या शो चा हिस्सा आहे याचा मला खूप आनंद वाटतो. ह्या शो ने मला कृष्णा बनवले. ही व्यक्तिरेखा आता केवळ भारतातच नव्हे तर लंडनमध्येही घरांघरांत पोहोचली आहे. आमचे चाहत्यांसोबत संवाद साधण्याचा आमचा अनुभव खूपच छान होता.”

आपले लंडनचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कृष्णा आता आपल्या आयुष्याचा मार्ग स्वतः निर्माण करेल आणि आपली ध्येये पूर्ण करेल. याचीच तर ती केव्हापासून प्रतीक्षा करत होती.

टॅग्स :कृष्णा चली लंडन