Join us

अद्वैत दादरकरचा नवीन लूक पाहून फॅन्सची झाली घोर निराशा, वाचा काय आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:18 IST

आशुतोष पत्कीने साकारलेली सोहमची म्हणजेच बबड्याची भूमिका अव्दैत दादरकर साकारत आहे. तर तेजश्री प्रधानने साकारलेली शुभ्राही भूमिका उमा हृषिकेश साकारत आहे.

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेचा पुढचा भाग म्हणजेच अग्गंबाई सुनबाई नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला आली  अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजीत, आजोबा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या होत्या. मात्र आशुतोष पत्कीने साकारलेला सोहम म्हणजेच सा-यांचा आवडता बबड्याने रसिकांची अधिक पसंती मिळवली होती.

आता या मालिकेच्या दुस-या सिझनमध्ये बबड्याच्या भूमिकेत अद्वैत दादरकर झळकत आहे. तर  तेजश्री प्रधाननं साकारलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री उमा पेंढारकर साकारतेय. मालिकेच्या दुस-या सिझनचा पहिला प्रोमो पाहून रसिकांनी नापसंती दर्शवली होती. त्यात बबड्या भूमिकेसाठी अव्दैत दादरकर अजिबात सुट होत नसल्याचे रसिकांनी म्हटले होते.

 

आता पुन्हा एका गोष्टीमुळे रसिकांची घोर निराशाचा झाली आहे. अव्दैत दादरकर मालिकेत दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. त्याचे दोन लूक समोर आले आहेत. एका लूकमध्ये तो अतिशय सभ्य दिसतोय तर दुस-या लूकमध्ये खोडकर अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र अद्वैतला दोन्ही भूमिकेत फिट बसत नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही लूकवर रसिकांनी नापसंतीच दिल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे बबड्या भूमिकेत अद्वैत दादरकरचा लूक पाहून अनेकांना त्याचा सभ्य अंदाज रुचला नाही आणि खोडकर अंदाजही काही रुचलेला नाहीय. पूर्वीचाच बबड्या बरा होता असेही  रसिक म्हणाताना दिसतायेत. तर काहींनी मालिका नव्याने रसिकांच्या भेटीला आणण्यात अर्थ काय असे अनेक प्रश्न करताना दिसतायेत. सुरुवातीपासून ना- ना करणारे रसिक आगामी काळात 'अग्गंबाई सूनबाई’ मालिकेला कितपत पसंती देतात हेच पाहणे रंजक ठरणार आहे. 

टॅग्स :अग्गंबाई सूनबाई