झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोमधील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोमधून विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam)ला खूप लोकप्रियता मिळाली आहे. भाऊ कदमने आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केले आहे. भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम(Mrunmayee Kadam)ने अद्याप कलाविश्वात पाऊल टाकले नसले तरी ती सातत्याने चर्चेत येत असते. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मृण्मयीची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
मृण्मयी कदम हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत हाताला सलाइन लावलेले पाहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, माझी परीक्षा सुरू होती. शेवटच्या दोन पेपरच्या वेळी अचानक माझ्या हाताने लेखन करणे जवळ जवळ सोडून दिले होते. मलाही वाटले की आता काही पेपर देता येणार नाहीत. तरीही मी प्रयत्न करत पेपर लिहिले. माझ्या अंगात ताकद नसताना. त्यातच मासिक पाळीचे असह्य दुखणे..पण हे सगळं सहन केले. फार काही गंभीर नाही फक्त व्हिटॅमिन आणि कॅल्शियम कमी झालंय शरीरातलं. बाकी मी बरी आहे.
तिने पुढे लिहिले की, आता फक्त व्हॉइस ओव्हर बाकी आहे, माझ्या मेकअप सीरिजच्या पुढच्या एपिसोडसाठी. आजच ५ ते ६ पोस्ट करत आहे. भाऊ कदमप्रमाणेच मृण्मयी देखील तितकीच क्रिएटिव्ह आहे. अर्थात ती तिची क्रिएटिव्हिटी सोशल मीडियावर पाहायला मिळते. ती एक युट्युबर आहे आणि ती तिचे क्रिएटिव्ह व्हिडीओ शेअर करत असते.