फराह खान (Farah Khan)ही बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माती आहे. याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोजची जजही राहिली आहे. फराहची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. फराह आणि फिल्म एडिटर शिरीष कुंद्रा (Shirish Kunder)यांनी 2004 मध्ये प्रेमविवाह केला होता. बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या लग्नात खूप धूम केली. फराहने खुलासा केला होता की, लग्नाच्या पहिल्याच वर्षी तिला घरातून पळून जायचे होते. गायक मिका सिंगच्या 'स्वयंवर: मिका दी वोहती' Swayamvar: Mika Di Vohti) च्या सेटवर तिने हा खुलासा केला.
फराह खान तिच्या मजेदार गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.'स्वयंवर'च्या सेटवर पोहोचलेल्या फराह खानने मिका सिंगसोबत लग्न करणाऱ्या स्पर्धकाशी बातचीत केली. यावेळी फराहने स्पर्धकांच्या अनेक प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली.
फराह खानला लग्नाचे पहिले वर्ष कठीण गेलेझूमच्या बातमीनुसार, फराह खान म्हणाली, 'मिका खूप संवेदनशील व्यक्ती आहे. मला वाटतं लग्न करण्यासाठी कोणतेही स्टँडर्ड वय नाही, योग्य व्यक्ती सापडल्यावर तुम्ही लग्न करा. लग्नाच्या पहिल्याच वर्षी मला पळून जायचे होते कारण ते जुळवणे खूप अवघड होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फराह खान आणि शिरीष कुंद्रा यांच्या अफेअरबद्दल कोणालाच माहिती नव्हती. फराहने लग्नाबद्दल खुलासा केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 'मैं हूं ना' चित्रपटादरम्यान शिरीष कुंद्राने फराह खानला प्रपोज केले होते. फराहचा हा पहिला चित्रपट होता, ज्याच्या एडिटींगसाठी शिरीषने खूप कमी पैसे घेतले होते. शाहरुख खानची पत्नी गौरी खानला पहिल्यांदा फराह आणि शिरीषच्या अफेअरची माहिती चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये मिळाली होती.
फराह खान आणि शिरीष कुंद्रा यांना तीन जुळी मुले आहेत. कझार, दिवा आणि अन्या, तिघेही आता १४ वर्षांचे आहेत. फराहने आपल्या मुलांसोबत व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.