“फराह माझी प्रेरणा आहे” एंटरटेनमेंट की @9- लिमिटेड एडिशनच्या सेटवर म्हणाली रविना टंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 11:12 AM
कलर्सचा एंटरटेनमेंट की रात @ 9लिमिटेड एडिशन वीकेंडला तुमचे मनोरंजन करण्यासाठी नामवंत व्यक्ती घेऊन येत आहे.पहिल्या एपिसोड मध्ये संजय ...
कलर्सचा एंटरटेनमेंट की रात @ 9लिमिटेड एडिशन वीकेंडला तुमचे मनोरंजन करण्यासाठी नामवंत व्यक्ती घेऊन येत आहे.पहिल्या एपिसोड मध्ये संजय दत्त आल्या नंतर आता दुसऱ्या गंमतीदार एपिसोड मध्ये रविना टंडन आणि फराह खान यांच्यातील सौहार्द दिसून येणार आहे आणि तो रविवारी प्रसारित होणार आहे.कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना,रविना म्हणाली,“फराहची आणि माझी मुले एकाच शाळेत शिकत आहेत. जेव्हा त्यांची पीटीए पार्टी असते तेव्हा फराह सर्व बाबा लोकांना एका खोलीत घेऊन डान्सचा मास्टर क्लास घेण्यात व्यस्त असते”.रविनाने पुढे सांगीतले, “मी जेव्हा 16 वर्षांची होते तेव्हा फराह माझी आदर्श होती. ती एक डान्सिंग स्टार होती आणि मला तिच्या विषयी आदर होता. तिने डान्सच्या सर्व इंटर-कॉलेज स्पर्धा जिंकल्या होत्या आणि ती व तिचा पार्टनर हेमू हे अगदी योग्य डान्सिंग कपल होते”.फराह ने सुध्दा सांगीतले,“आम्हाला रविनाचा अतिशय अभिमान वाटतो, ती फक्त 21 वर्षांची होती तेव्हा तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे आणि ती एकटी आई बनली आहे. तिने त्यातील एका मुलीचे लग्न ही केले आहे आणि आता ती नानी सुध्दा बनली आहे”.या सीझनला टेलिव्हिजन दिवा सौम्या टंडन आणि नेहा पेंडसे शोमध्ये दिसणार आहेत आणि त्यांच्या सोबत असणार आहेत प्रसिध्द माजी आरजे अभिलाष आणि कॉमेडियन मुबिन सौदागर, बलराज आणि बालकलाकार दिव्यांश त्यांच्या सिग्नेचर शैलीत तुमचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.लोकप्रिय मागणी वरून, कलर्सने एंटरटेनमेंट की रात@9 या वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधक शोची दुसरी आवृत्ती आणली आहे.गेल्या सीझनमध्ये या शोला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि आता तो यावेळी रात्री 9 वाजताच्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येणार आहे.या सीझनचा सुरूवातीचा एपिसोड सुरू करताना बॉलिवूडचा लाडका संजय दत्त हा पहिला अतिथी असणार आहे आणि तो होस्ट सौम्या टंडन व नेहा पेंडसे, कॉमेडिवीर मुबिन सौदागर,बलराज आणि बालकलाकार दिव्यांश यांना सामील होणार आहे.तुरूंगातील दिवसांविषयी आणि त्याच्या कुटुंबात राहताना मिळणाऱ्या आनंदा विषयी संजय दत्त अगदी प्रांजळपणे बोलला.“येरवड्यात असताना मी आरजे झालो होतो आणि तेथील बरेच सहकारी हे माझे चाहते होते आणि त्यांना माझे बोलणे ऐकायला आवडत असे. माझी शिक्षा सुसह्य करणारे आणि माझा वेळ आनंदात घालविण्यासाठी त्यांनी खूप मदत केली होती,”असे यावेळी त्याने सांगितले.मुलांविषयी विचारले असता, त्याच्या डोळ्यात एक चमक आली आणि तो म्हणाला, “माझ्या मुलांनी आधी शिकून पदवी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर त्यांना जे काही करायचे असेल त्यात मी त्यांना पाठिंबा देईन.माझे गणित अतिशय वाईट होते, त्यामुळे मी त्यांना ते शिकवत नाही, पण क्राफ्ट आणि पेंटिंग करण्यात मी त्यांना मदत करतो.”अशा अनेक गुपितांच्या उलगडण्यातून टीमला या सुपरस्टार सोबत हास्य आणि गंमत अनुभवायला मिळणार आहे.